आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीसाठी जाणाऱ्यांना कारची धडक, एक ठार तर एक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अविनाश पाटील - Divya Marathi
अविनाश पाटील
पहूर - जळगाव-औरंगाबाद राज्य मार्गावर मंगळवारी रात्री खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कारचा अपघात झाला. त्यांना मदतीसाठी धावत जाणाऱ्या दाेघांना दुसऱ्या कारने धडक दिली. त्यात पहूरपेठ येथील एक जागीच ठार, तर एकजण जखमी झाला. जखमीवर जळगावला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाकोद रस्त्यावरील बालाजी पेट्रोल पंपाजवळ एका कारचा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. तेथेच पेट्रोल पंपावर काम करणारे नंदू उर्फ अविनाश शशिकांत पाटील (वय ५१) गोकुळ भानुदास चव्हाण (वय २२) हे दोघे अपघात झाल्याचे समजताच कारकडे धावत गेले. अपघातग्रस्त कारजवळ येताच पहूरकडून औरंगाबादकडे जाणारी होंडा सिटी कारने (क्र. एम.एच. २०- सी.एच. ५४२१) दाेघांना जोरदार धडक दिली. यात अविनाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोकुळ चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, कारचालक देवानंद मुकुंदा हावळे (रा. औरंगाबाद) याला रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले.

रस्त्यावर दीड फुटाचे खड्डे
जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. जळगावपासून औरंगाबादपर्यंत वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागते. यात अपघात होऊन बरेच जण मृत्युमुखी पडले अाहेत. राज्यमार्ग तयार करण्यासाठी बांधकाम विभाग अजून किती जणांचा बळी घेणार, हे काळच ठरवणार.

खड्ड्यांमुळे अपघात
-
जळगाव-औरंगाबाद राज्यमार्ग खड्डेमय झाला आहे. यामुळे दररोज अपघात होत अाहेत. वाघूरच्या पुलावरही खड्डे पडले आहेत. यामुळेही भीषण अपघात होण्याची भीती आहे. मंत्र्यांच्या तालुक्यात रस्ते खड्डेमय आहेत. त्यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. आतातरी लाेकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे.
श्यामसावळे, ग्रामपंचायत सदस्य ,
बातम्या आणखी आहेत...