आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या करिअरवर चर्चा होते, पण खेळावर नाही- अायरनमॅन काैस्तुभ राडकर यांनी नोंदवले मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अलीकडे महानगरांप्रमाणेच छाेट्या शहरामध्ये मॅरेथाॅनचे प्रमाण त्यामध्ये धावणाऱ्यांची संख्याही वाढली अाहे. मात्र, शास्त्राेक्त पद्धतीने कसे धावायला हवे, काय अाहार असावा याबाबत जागरूकतेची अद्याप कमी अाहे. त्यामुळे क्रिकेटप्रमाणे धावण्याची संस्कृती अापल्याकडे वाढायला हवे. त्यासाठी शासन सामाजिक स्तरांवरून प्रोत्साहन देण्याची अावश्यकता अाहे. तसेच घरात मुलांच्या करिअरवर चर्चा होते, पण खेळावर होत नाही, असे मत १६ वेळा अार्यनमॅन फिनिशर असलेल्या कौस्तुभ राडकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
 
जळगावच्या रनर्स गृपतर्फे शहरातील निवडक संपादकांचा ‘काॅफी विथ काैस्तुभ’ हा कार्यक्रम अायाेजित केला हाेता. या वेळी काैस्तुभ यांनी या खेळाबाबत मनमाेकळ्या गप्पा मारल्या. या वेळी त्यांच्या साेेबत रनर अमाेल भिडे यांनीही सहभाग घेतला. या दाेघांनी गुरुवारी सकाळी शहरातील क्रीडा संकुल मूजे महाविद्यालय तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणीही केली. त्यांनी जळगाव रनर्स गृपच्या पुढाकाराचे काैतुकही केले. 
आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथलॉन या क्रीडाप्रकारातील ही स्पर्धा जगभरात विविध ठिकाणी भरवली जाते. अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी नामांकित ट्राएथलीट्स वर्षभर तयारी करत असतात. नुसते पार करायचे अंतर जरी लक्षात घेतले तरी या स्पर्धेच्या दर्जाची कल्पना येईल. यात ३.८ किमी पाेहणे, १८० किमी सायकलिंग ४२ किमी धावण्याचा समावेश असताे. ही स्पर्धा काैस्तुभ यांनी १६ वेळा पूर्ण केली. 
भारतीय धावपटूंमध्ये विदेशातील काेणत्याही धावपटूंच्या तुलनेत क्षमता कमी नाही, किंबहुना अधिक अाहे. भारतीय धावपटूंना तिन्हीही ऋतूंमध्ये सराव करण्याची संधी मिळते. त्यांना याेग्य प्रशिक्षण मार्गदर्शन मिळाल्यास भारतीय धावपटूही अांतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ दाखवू शकतात. यासाठी अॅथलेटिक्स असाेसिएशनने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. 

परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीयांची क्षमता अधिक 
भारतात खेळांबाबत असलेल्या पायाभूत सुविधा, शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकाेन अाणि सामाजाचे मर्यादित प्राेत्साहन यांची विदेशातील वातावरणाशी तुलना केली. परदेशी खेळाडूंच्या तुलनेत अापल्या खेळांडूची क्षमता अधिक अाहे. पण त्यांना याेग्य वयात याेग्य मार्गदर्शन प्रशिक्षण मिळण्याची गरज त्यांनी बाेलून दाखविली. यासाठी भारतीय अॅथलेटीक्स असाेसिएशनने पुढाकार घेण्याची गरज असल्याची अावश्यकता काैस्तुभ यांनी व्यक्त केली. 
 
१५ वर्षांपासून धावण्याचा प्रयत्न करावा 
भारतातअलिकडे मॅरेथाॅनमध्ये सहभाग नाेंदवण्यांची संख्या वाढली अाहे. मात्र, मुलांना वयाच्या १५ वर्षांपासून धावण्यासाठी प्रयत्न करण्याची अावश्यकता अाहे. मुलांच्या करिअर करण्यावर चर्चा हाेते. पण तुला काेणता खेळ अावडताे, तु अाज व्यायाम केला का? यावर चर्चा होतांना दिसत नाही. 
बातम्या आणखी आहेत...