आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन नकाशानुसार सोळा गावे हद्दीत घेण्याची तयारी, अाैद्याेगिक क्षेत्रही वगळले; पुन्हा होईल बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहराच्या हद्दवाढीत नव्याने १६ गावांचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. त्यासाठी नव्याने नकाशा तयार केला जात अाहे. यामध्ये लळिंग हे गाव पूर्ण वगळण्याची तरतूद केली जात असून, सावळदेच्या काही भागाचा समावेश केला जाणार अाहे. अवधानचे अाैद्याेगिक क्षेत्रही वगळण्यात अाले अाहे. या १६ गावांपैकी यापूर्वी काही गावे वगळण्याचा निर्णय झाला हाेता. बहुतांशी गावांनी महापालिका हद्दीत यायला विराेध केला हाेता. मात्र, त्यामुळे मनपाचे क्षेत्र पुरेशे हाेत नाही म्हणून नव्याने नकाशा केला जात अाहे. ताे जिल्हाधिकाऱ्यांना साेपविण्यात येणार अाहे.
महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर क्षेत्रफळ जवळपास दुपटीने विस्तारणार अाहे. यावर संबंधित गावांच्या हरकती झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर सुनावणीही घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत महापालिकेत पूर्णपणे गावांचा समावेश करता काही दूरच्या गावांचे केवळ विनाशेती क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. तसा नकाशा तयार करण्याच्या सूचना महापालिकेच्या नगररचना विभागाला करण्यात आल्या होत्या. नगररचना विभागाकडून तसा नकाशा तयार करणे सुरू असताना पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकीत या गावांचा पूर्णपणे समावेश करून तसा नकाशा तयार करण्याच्या सूचना झाल्या आहेत. मात्र, यात लळिंग गाव पूर्णपणे वगळण्यात आले आहे. अवधान औद्याेगिक क्षेत्रही वगळण्यात आले आहे. तर सावळदे या गावाच्या काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. १६ गावांचा समावेश असलेला शहराच्या हद्दवाढीचा प्रस्तावित नकाशा तयार करण्यात आला आहे. तो नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यावर चर्चा होऊन काय बदल सुचविण्यात आल्यास त्याप्रमाणे बदल करण्यात येईल तो अंतिम झाल्यावर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. १६ गावांचा समावेश करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे मनपाच्या नगररचना विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

^शहराचा सर्वांगीणविकास करायचा असेल तर शहराचा विस्तारही तितकाच मोठा असायला हवा. त्याशिवाय उद्योग वाढीला चालना मिळत नाही. त्यासाठी गावे वाढवावी लागतील. अिनलगोटे, आमदार

क्षेत्रफळ वाढले पाहिजे क्षेत्रफळ ७० चौरस किमी
महापालिकेचीहद्दवाढ प्रस्तावित आहे. यात शहराच्या परिसरातील १६ गावांचा समावेश होऊ शकतो. सध्या शहराचे क्षेत्रफळ ४६ चौरस किलोमीटर आहे. आता नव्याने समावेश होणाऱ्या गावांचा समावेश झाल्यास ते ७० चौरस किलाेमीटर इतके होऊ शकते. सुरुवातीला हे वाढीव क्षेत्र १०० चौरस किलाेमीटरवर गेले होते.

मनपा बरखास्तीची भीती...
महापालिकेची हद्दवाढ प्रस्तावित आहे. महापालिका झाल्यानंतर प्रथमच शासनाने हद्दवाढीचा निर्णय घेतला आहे. या हद्दवाढीत १६ गावांचा समावेश आहे. त्यात शहरालगतची काही अंतरावरील गावांचा समावेश आहे; परंतु हद्दवाढीनंतर मनपा बरखास्त होईल का याकडे लक्ष लागून आहे. सध्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...