आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडी डब्याला आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डहाणू थर्मल पॉवर स्टेशनला कोळसा घेऊन जाणारी मालगाडी शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर उभी होती. या मालगाडीच्या एका डब्यातून धूर निघत असल्याचे रेल्वेच्या सुरक्षारक्षकाला लक्षात आले. त्यानंतर अर्ध्यातासात ही आग मनपा अग्निशमन दलाच्या बंबाच्या साहाय्याने विझवण्यात आली.
डहाणू थर्मल पॉवर स्टेशनला कोळसा घेऊन जाणारी मालगाडी शुक्रवारी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर थांबली होती. या वेळी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान जात असताना त्यांना मालगाडीच्या एका डब्यातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. आगीमुळे संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरात धूर पसरला होता. त्यामुळे त्यांनी या घटनेबाबत तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळात मनपाचा एक बंब रेल्वेस्थानकावर दाखल झाल्यानंतर अर्ध्यातासात ही आग आटोक्यात आली. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता ही मालगाडी भुसावळकडे रवाना झाली.