आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी अाराेग्याची : 5 हजार भक्तांना 'एक थेंब स्वाइन फ्लूचा डोस'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला भाविकास स्वाइन फ्लूचा डोस देताना जिल्हाधिकारी. - Divya Marathi
महिला भाविकास स्वाइन फ्लूचा डोस देताना जिल्हाधिकारी.
जळगाव  - शहरात स्वाइन फ्लूचे रूग्ण वाढत अाहे. यावर मात करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ची संकल्पनेला साथ देऊन सार्वजनिक गणेशाेत्सव महामंडळ आरोग्य भारतीने पुढाकार घेत ‘एक थेंब स्वाइन फ्लूचा डोस’ हा उपक्रम हाती घेतला अाहे. यात स्वाइन फ्लू चा प्रसार रोखण्यासाठी भाविकांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक हाेमीअाेपॅथीच्या अाैषधीचा एक थेंब भाविकांना पाजण्यात येत अाहे. त्याअनुषंगाने शनिवारी स्टेशन रोडवरील जय गणेश मंडळातर्फे सुमारे हजार भाविकांना अाैषधीचा एक थेंब प्रसाद म्हणून देऊन उपक्रमाची सुरूवात करण्यात अाली. येत्या दाेन दिवसात सुमारे १० मंडळातर्फे ५० हजार भाविकांना डोस देण्यात येणार अाहे. 

‘एक थेंब स्वाइन फ्लूचा डोस’ उपक्रमाची सुरूवात जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या हस्ते भाविकांना डाेस पाजून करण्यात अाली. महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर यांनी ‘दिव्य मराठी’च्या संकल्पना सार्वजनिक गणेशाेत्सव महामंडळ आरोग्य भारतीच्या माध्यमातून जय गणेश मंडळाने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद अाहे. उत्सवांच्या माध्यामातून असे उपक्रम राबविणे ही सामाजिक गरज अाहे, असे सांगितले. या वेळी आरोग्य भारतीचे डॉ. रितेश पाटील, उपक्रमाचे समन्वयक राकेश तिवारी, महामंडळाचे सदस्य किशोर भोसले, अमित भाटिया, मंडळाचे अध्यक्ष चंचल सोनी, संस्थापक अध्यक्ष राहुल तोडा, दीपक दाभाडे, प्रदीप आहुजा, डॉ. गोविंद मंत्री उपस्थित होते. सुरज दायमा, संदीप दहाड,अमीत झंवर, सौरभ सोनी, शानु परदेशी, रवी तायडे, ललित बडगुजर, संदीप धांडे उपस्थित हाेते. पुढील तीन दिवस हा उपक्रम शहरातील विविध मंडळातर्फे राबविण्यात येणार आहे. 
 
उपक्रमाच्या पहिल्या दिवशी भाविकांचा प्रतिसाद 
गणेशोत्सवातील गर्दीत आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी ‘एक थेंब स्वाइन फ्लूचा डोस’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची सुरूवात शनिवारी झाली. भाविकांनी उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत स्वत:हून स्वाइन फ्लूचा डोस घेतला. 
 
या मंडळांतर्फे हाेतयं अाैषधीचे वाटप 
{ मार्केट यार्ड गणेश मंडळ, अयोध्यानगर (यार्डरहिवास एरिया) 
{ नटराज गणेश मंडळ, जुने जळगाव 
{ जय गणेश मंडळ, स्टेशन राेड 
{ स्नेहल प्रतिष्ठान, पिंप्राळा 
{ पंचरत्न गणेश मंडळ,नवीपेठ 
{ वज्रेश्वरी गणेश मंडळ 
{ एकता गणेश मंडळ, नवीपेठ 
{ लालबाग गणेश मंडळ, सागर पार्क 
{ केशव क्रीडा गणेश मंडळ, पाेलन पेठ. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, सुटीमुळे भाविकांची तोबा गर्दी; कार्यकर्त्यांची दमछाक... 
बातम्या आणखी आहेत...