आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेची चालू वर्षात एकाच वेळी वाढली ६० टक्के फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्याइंग्लिश स्कूल प्रशासनाने चालू वर्षात एकाच वेळी ६० टक्क्यांपेक्षा जास्त फीवाढ केल्याने पालक संतप्त झाले आहेत. या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी शाळेची चौकशीही सुरू केली आहे.
वदि्या इंग्लशि स्कूलमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेने या वर्षापासून सर्वच वर्गांच्या फीमध्ये भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे पालकांवर अतिरिक्त ताण पडला आहे. या सदंर्भात पालकांनी शाळा प्रशासनाची चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पालकांना शाळेत जाऊ देता प्रवेशद्वारावरच अडवले जाते, वदि्यार्थ्यांना धमक्या दिल्या जातात असे आरोप पालकांनी केले. शुक्रवारी काही पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन चर्चा केली. शाळेने एकाच वेळी एवढी जास्त फी वाढवता टप्प्या-टप्प्याने वाढवली पाहिजे होती, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

सर्व काही नियमाने
सर्व काही नियमाने होत आहे. गेल्या चार वर्षांपासून फी वाढवलेली नव्हती. यंदा वाढवली आहे. त्यासाठी नियम पाळले गेले आहेत. शाळेत चांगल्या प्रकराच्या सुविधा दिल्या जातात. अनुभवी, तज्ज्ञ शिक्षकांची भरती केली आहे. तरीही पालकांनी तक्रार केली आहे. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून चौकशीअंती जो निर्णय होईल तसे बदल केले जातील. - विजयकुमारवाणी, संस्थाध्यक्ष

पालकांचे आरोप
- एकाच वेळी ६० टक्क्यांपेक्षा जास्त फी वाढवली.
- पालकांना शाळेत येऊ देत नाहीत.
- फीसाठी वदि्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात आहेत.
- वर्षांपासून शाळेला मुख्याध्यापक नाही.
- अनधिकृतपणे शिक्षकांची भरती करण्यात आली आहे.
- शासनाच्या मान्यतेशिवाय तुकड्या वाढवल्या आहेत.

पालकांच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू
पालकांच्यातक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी याच महिन्यात शाळेत जाऊन चौकशी केली आहे. यात पालक शिक्षक संघाच्या बैठकींचे इतिवृत्त, हजेरी मस्टर आदी गोष्टींची त्यांनी कसून चौकशी केली. दरम्यान, यात अनेक त्रुटी आढळून आल्या असल्याचे चौकशीवेळी तेथे उपस्थित असलेल्या पालकांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले आहे.

मुलांना धमक्या दिल्या जातात
शाळेतगैरप्रकारे शिक्षकांची भरती झाली आहे. या संदर्भात आम्ही लेखी तक्रारी केल्या आहेत. अचानकपणे जास्त फी वाढवल्याचे कारण सांगितले जात नाही. मुलांना धमक्या दिल्या जात आहेत. -विनोद पाटील, पालक

आम्हालाशाळेत येऊ देत नाही
फीवाढीसंदर्भात पालक सभा झाली नाही. आता पालक जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना शाळेत येऊ दिले जात नाही. गेटवर चर्चा करण्यासाठीसुद्धा कोणीही येत नाही. शाळेत हुकूमशाही सुरू आहे. -नवल पाटील, पालक
बातम्या आणखी आहेत...