आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेमधील ‘त्या’ सहा अभियंत्यांचे निलंबन अखेर रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेतील उपायुक्त राजेंद्र फातलेंच्या लाच प्रकरणानंतर चर्चेत अालेल्या सहा अभियंत्यांवरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात अाली अाहे. शहर अभियंत्यांकडे सर्व सहा जणांची पदस्थापना करण्यात अाली अाहे. बुधवारनंतर त्यांना जबाबदारी साेपवली जाणार असल्याची माहिती मंगळवारी अायुक्त जीवन साेनवणे यांनी दिली.
पालिकेच्या नगररचना विभागातील सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत महासभेने केलेल्या ठरावाला विराेध करत त्यांची पाठराखण केल्याचे प्रकरण गेल्या वर्षी चांगलेच गाजले हाेते. यात नगररचनातील तत्कालीन सहायक नगररचनाकार अरविंद भाेसले, रचना सहायक गाेपाळ लुले, सतीश परदेशी, संजय पाटील, नरेंद्र जावळे, याेगेश वाणी यांनी महासभेचा अवमान केला म्हणून त्यांना महासभेत तातडीने हजर राहण्याचे फर्मान काढण्यात अाले हाेते. परंतु, अादेशानंतरही ते वेळेवर हजर झाल्याने त्यांच्या निलंबनाचा बडतर्फीचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात अाला हाेता.
दरम्यान, तत्कालीन अायुक्त संजय कापडणीस यांनी २० मे राेजी सहा जणांचे निलंबन मागे घेत सक्त ताकीद देऊन त्यांना कामावर घेण्याचे अादेश दिले हाेते. परंतु, पाच महिने उलटूनही कारवाई मागे घेण्यात अाली नव्हती. त्यामुळे अभियंते अस्वस्थ झाले होते.

२४ ऑक्टोबर रोजी सहा जणांची होती सुनावणी
२४ अाॅक्टाेबर राेजी सहा जणांची सुनावणी घेण्यात अाली. त्यासंदर्भातील टिपणी अास्थापना विभागाने मंगळवारी दुपारी अायुक्त साेनवणे यांच्याकडे सादर केली. संपूर्ण प्रकरण पडताळून पाहिल्यानंतर सायंकाळी निलंबित सहा जणांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. शहर अभियंता दिलीप थाेरात यांच्याकडे सहा जणांची पदस्थापना करण्यात अाली असून त्यांच्यामार्फत सहा जणांना जबाबदारी साेपवली जाणार अाहे.

फाइल अडली कुठे? चाैकशी हाेणार
सहाअभियंत्यांवर १३ अाॅक्टाेबर २०१५ राेजी निलंबनाची कारवाई झाली हाेती. त्यानंतर मे २०१६ राेजी दाेषाराेप निश्चित करण्यात अाले हाेते. यात १३ मे राेजी सहा जणांनी खुलासा दिला हाेता. तत्कालीन अायुक्त कापडणीस यांनी २० मे राेजी निलंबनाच्या फाइलवर अापला शेरा देत कारवाई मागे घेऊन पदस्थापना देण्याचे अादेश केले हाेते. परंतु, २० मेपासून अाॅक्टाेबरपर्यंत फाइल नेमकी कुठे कुठे अडली की अडकवली गेली? याची माहिती अायुक्त साेनवणे घेणार अाहेत. त्यानंतर संबंधितांची चाैकशी होईल.

आता ताे ठराव विखंडित हाेणार
सहाजणांच्या निलंबनासह बडतर्फीचा ठराव महासभेने मंजूर केला हाेता. परंतु, तत्कालीन अायुक्त कापडणीस यांनी ताे ठराव शासनाकडे विखंडनासाठी पाठवला हाेता. त्यावर शासनाने ठराव निलंबित केला हाेता. परंतु, विखंडनाचा निर्णय प्रलंबित हाेता. अाता ताे ठराव विखंडित करण्याचा मार्गही माेकळा झाला अाहे. त्यासंदर्भातील टिपणीवर प्रधान सचिवांची स्वाक्षरी झाली अाहे. लवकरच अादेश निघण्याची शक्यता अाहे. त्यामुळे अाता सहा अभियंत्यांशी संबंधित प्रकरणावर पडदा पडेल.
बातम्या आणखी आहेत...