आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवकर ३७०, रायसाेनी १२५२ दिवसांनी तर जैन यांना १६३५ दिवसांनी मिळाला जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यभर गाजलेल्या घरकुल घाेटाळ्यातील प्रमुख संशयित अाराेपी माजी अामदार सुरेश जैन यांना शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयाने विनाशर्त जामीन मंजूर केला. घरकुल घाेटाळ्यात पाच प्रमुख संशयित अाहेत. ते जळगाव शहर तथा जिल्ह्यातील सत्ता केंद्र हाेते. मात्र, त्यांचा कारागृहातील कालखंड हा वेगवेगळा अाहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर हे सर्वात कमी काळ (३७० दिवस) कारागृहात राहिले अाहेत. तर सर्वाधिक कालावधी कारागृहात घालवणारे संशयित अाराेपी माजी अामदार सुरेश जैन हे ठरले अाहेत. त्यांना तब्बल १६३५ दिवसांनंतर जामीन मिळाला अाहे. कमी काळ कारागृहात राहण्याच्या क्रमवारीत दुसऱ्यास्थानी माजी महापाैर प्रदीप रायसाेनी (१२५२ दिवस), तिसऱ्यास्थानी जगन्नाथ वाणी (१४०८ दिवस), चाैथा क्रमांक राजा मयूर यांचा लागताे. त्यांनी १४३७ दिवस कारागृहात घालवले अाहेत.
शहरातील झाेपडपट्टीचे निर्मूलन करण्यासाठी माेफत घरे देण्याच्या याेजनेतून साकारल्या जाणाऱ्या घरकुल याेजनेत २९ काेटी रुपयांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी २००६ मध्ये याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर चक्र फिरून तपासाला गती मिळाली. २८ जानेवारी २०१२ पासून माजी महापाैर प्रदीप रायसाेनींसह चाैघांना अटक हाेऊन अटकसत्राला सुरुवात झाली. यात माजी अामदार प्रमुख संशयित सुरेश जैन यांचे जीवलग मित्र राजेंद्र मयूर मेजर तथा जगन्नाथ वाणी तसेच मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना अटक करण्यात अाली हाेती. त्यानंतर ४३ व्या दिवशी सुरेश जैन यांना नाट्यमय घडामाेडीनंतर मध्यरात्री अटक करण्यात अाली. दरम्यानच्या काळात राज्यमंत्री असलेल्या गुलाबराव देवकरांची अटक टळत गेल्याने माेठा दिलासा मिळाला हाेता. परंतु सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानंतर त्यांनाही पहिल्या अटकेपासून ७०२ दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर २०१३ राेजी न्यायालयात शरण जावे लागले. सगळ्यात शेवटी अटक झालेले देवकर हे सर्वात अाधी जामीन मिळालेले भाग्यवंत ठरले. त्यानंतर मात्र घरकुल गुन्ह्यातील प्रदीप रायसाेनी, जगन्नाथ वाणी राजेंद्र मयूर यांनाही अटी, शर्तींना अधिन राहून सर्वाेच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला हाेता. प्रमुख पाचही अाराेपींपैकी चार जणांना जामीन मंजूर हाेऊनही संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष माजी अामदार सुरेश जैन यांच्या जामिनाकडे लागून हाेते. न्यायालयीन सुनावणी लांबत गेल्याने सुनावणीची तारीख विसरलेल्या अनेकांसाठी जैन यांना जामीन मंजूर झाल्याची वार्ता धक्का देणारी ठरली. अापल्या सहकाऱ्यांना अटक झाल्याने सुरेश जैन हे तसे पहायला गेले तर २८ जानेवारी २०१२ पासूनच तणावात अाले हाेते. त्यामुळे त्यांची अटक उशिरा झाली असली तरी अापल्या जीवलग मित्रांच्या अटकेमुळे ते मानसिक तणावात असल्याचे पाहायला मिळाले हाेते. त्या दृष्टीने बघितल्यास पहिल्या अटकेपासून ते जैन यांच्या जामिनापर्यंतचा १६८१ दिवसांचा कालावधी जैन यांच्यासाठी जेलसारखाच ठरल्याचे बाेलले जात अाहे.

अटक : १०मार्च २०१२ जामीन: सप्टेंबर२०१६ अटकेतीलदिवस : १६३५
अटक : ३१डिसेंबर २०१३ जामीन: जानेवारी२०१५ अटकेतीलदिवस : ३७०
अटक : २८जानेवारी २०१२ जामीन: जानेवारी२०१६ अटकेतीलदिवस : १४३७
अटक : २८जानेवारी २०१२ जामीन: डिसेंबर२०१५ अटकेतीलदिवस : १४०८
अटक : २८जानेवारी २०१२ जामीन: जुलै२०१५ अटकेतीलदिवस : १२५२
बातम्या आणखी आहेत...