आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पा थर्ड क्लास म्हटले म्हणून घर साेडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनासारखे जगायचे म्हणून घर साेडलेल्या जुने जळगावातील युवतीचा शाेध घेण्यास शनिपेठ पाेलिसांना यश अाले अाहे. पाेलिसांनी शुक्रवारी सायंकाळी वाजता तिला मुंबई येथून परत अाणले. वडील ‘थर्ड क्लास’ म्हटल्याचा राग अाल्याने मी घर साेडले हाेते, असे युवतीने शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अात्माराम प्रधान यांना सांगितले.
जुने जळगावातील पूनम (नाव बदललेले) ही २९ मार्च रोजी घरी काेणीही नसताना चिठ्ठी लिहून घर साेडले हाेते. ती साेबत एक लाख रुपये घेऊन गेली हाेती. याप्रकरणी पूनमच्या वडिलांनी शनिपेठ पाेलिस ठाण्यात हरवल्याची नाेंद केली हाेती. त्यानंतर शनिपेठ पाेलिसांनी पूनमचा शाेध घेतला. ती मुंबईत नालासाेपारा येथे एका लाॅजमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यावरून पाेलिसांनी शाेध घेतला. तेव्हा ती मुंबईत पूनम टागाेरनगरातील महेश (नाव बदललेले) या तरुणासाेबत राहत हाेती. ताे एका डाॅक्टरकडे कंपाउंडरचे काम करीत हाेता. दादर पाेलिस ठाण्यात गुरुवारी ते दाेघे हजर झाले. शुक्रवारी दाेघांना शनिपेठ पाेलिस ठाण्यात अाणण्यात अाले. पूनमने घरून नेलेल्या एक लाख रुपयांपैकी ७९ हजार रुपये परत अाणले अाहेत. याप्रकरणी काेणीही तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात अाला नाही. पूनम अाणि महेशसह त्यांच्या पालकांचेही जबाब शुक्रवारी घेण्यात अाले. या वेळी निरीक्षक प्रधान यांनी पूनमचे समुपदेशन केले. त्यात तिने पप्पांनी मला "थर्ड क्लास' म्हटले हाेते. त्यामुळे मी घरातून निघून गेल्याचे तिने सांगितले.