आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्चंट‌्सच्या ४७ जणांवर जबाबदारी निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील दि मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या आजी-माजी संचालक, व्यवस्थापकांसह ४७ जणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोटी १४ लाख ५१ हजार रुपयांसह चौकशी अहवालाच्या शुल्कापोटी लाख ९७ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक रामेंद्रकुमार जोशी यांनी दिले आहेत.

येथील मर्चंट्स बँक अवसायनात गेल्यानंतर बँकेचे एप्रिल २००९ ते मार्च २०१० या कालावधीत वैधानिक लेखापरीक्षण करण्यात आले. या अहवालातील गंभीर मुद्द्यांच्या आधारे दोषींवर कार्यवाही करण्यासाठी सहायक निबंधक एन. बी. चौधरी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार चौधरी यांनी४७ जणांची कलम ८८ नुसार चौकशी करून त्यांच्यावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित केली आहे. या सर्वांना नोटीस बजावण्यात आली.

त्याचबरोबर म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान पडताळणीअंती आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या ४७ जणांकडून कोटी १४ लाख ५१ हजार १४८ रुपये तसेच चौकशी शुल्कापोटी लाख ९७ हजार ५८८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार जमीन महसुलाची बाकी वसूल करण्याच्या पद्धतीप्रमाणे ही रक्कम वसूल करण्यासाठी वसुली प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९८ अन्वये वसुली प्रमाणपत्र जारी केल्याची माहिती बाळकृष्ण अमृतकर यांनी दिली.

हे आहेत जबाबदार
रमेशचंद्र मुंदडा, घेवरलाल बाफना, केचरदास ताथेड, दिनेश बियाणी, नितीन शाह, श्रीकुमार पसारी, मोहन छाजेड, चंद्रकांत केले, महेश शहांचे वारसदार, रमेश खंडेलवाल, श्रीपाल मुणोत, चंद्रकला छाजेड, अनुराधा खानकरी, विमल परदेशी, मंजू गिंदोडिया, डॉ. यशवंत महाले, प्रवीण शाह, गोपाल माने, प्रकाश पाटील, सुनील बाफना, किशोर ओसवाल, सुरेश छाजेड, केशव कुलकर्णी यांचे वारसदार, सुभाष देवरे, रामकृष्ण उपाध्ये, प्रकाश मुंदडा, गुणवंत देवरे, प्रमोद जैन, सुरेश देसर्डा, विनोद पटवारी, अनिल कचवे, विजय चिंचोले, दत्तात्रय लोखंडे, नितीन खिवसरा, दिलीप राजपूत, डॉ. शांताराम कुलकर्णी, अविनाश नगराळे, सुषमा बागुल, मीना उपाध्ये, राहुल मुंदडा, फकिरा पाटील, गोपाळ केले, मोहन जामकर, बी. डी. कांकरिया, अजित हिरन, अशोक बहाळकर, आर. बी. पाटील.