आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात तारांना धडकून विमान कोसळले; 6 जखमी, साक्री तालुक्यातील दातर्तीजवळील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- साक्री तालुक्यातील दातर्ती येथे विजेच्या तारांना धडकून बाॅम्बे फ्लाइंग क्लबचे विमान काेसळल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली. या अपघातात मुख्य पायलट कॅप्टन जे.पी.शर्मा, दाेन प्रशिक्षणार्थी युवतींसह सहा जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.   


शहरात बाॅम्बे फ्लाइंग क्लबतर्फे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी गाेंदूर विमानतळावर केंद्र अाहे. त्याठिकाणी दिवसभर तसेच रात्रीच्या वेळीही प्रशिक्षण दिले जाते. शुक्रवारी रात्री अाठ वाजेच्या सुमारास विमानाने उड्डाण घेतले आणि तांत्रिक बिघाडामुळे काेसळले. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी मात्र विजेच्या तारांना धडक दिल्याने विमान काेसळ्याचे सांगितले. त्यात दाेन प्रशिक्षक व चार प्रशिक्षार्थी असे सहा जण हाेते. त्यातील चाैघांना दुखापत झाली. तर दाेघांना िकरकाेळ दुखापत झाली. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर  विमानाच्या काचा फुटल्या. ज्या शेतात विमान काेसळले हाेते तेथील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. अपघातानंतर नागरिकांनी गर्दी केल्याने प्रशिक्षण घेणारे त्या ठिकाणाहून हलण्यास तयार नव्हते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर साक्री पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विमानाला अपघात झाल्याची माहिती प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली.   

 

कॅप्टनच्या प्रसंगावधानाने माेठी  घटना टळली
प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचे पायलट कॅप्टन जे.पी.शर्मा यांना तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गावापासून दूर शेतात विमानाचे सरळ रेषेत लँडिंग केले. त्यामुळे शर्मा आणि इतरांना िकरकाेळ दुखापत झाली. कॅप्टन शर्माच्या सतकर्तमुळे माेठी दुर्घटना टळली. सदर घटनास्थळ हे केवळ गावापासून दाेनशे मीटर अंतरावर अाहे. गावात काेसळले असते तर माेठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली असती.

 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...