आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटमध्ये हातसफाई करणाऱ्या मुक्या चाेरापुढे पोलिस हतबल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रचना कॉलनीतील चंद्रा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये सोमवारी हातसफाई करणारा मुका चाेरटा मंगळवारी देखील काहीच बोलला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी हतबल होऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.

असिफ देशपांडे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला त्यांनी नागरिकांनी पकडले होते. पोलिसांनी सोमवारी रात्री त्याला बराच वेळ बोलते करण्याचा प्रयत्न केला पण तो एक शब्ददेखील बोलला नाही. मंगळवारीदेखील पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले; मात्र एमआयडीसी पोलिसांनी तो कुठे जातो. यासाठी साध्या वेशातील कर्मचारी त्याच्या मागे लावले आहेत. जेणे करून त्याचे दोन्ही साथीदार सापडतील असा पोलिसांचा अंदाज आहे.