आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Rate Of Food Issue At Jalgaon, Divya Marathi

अन्नधान्याचे दर आवाक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या वर्षी झालेला चांगल्या पावसामुळे झालेली उत्पादन वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ आणि वर्षभराची खरेदी आटोपल्याने बाजारातील उलाढाल मंदावली आहे. अशा विविध कारणांमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्यात आल्याने गृहिणींना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

महागाईमुळे होरपळलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येताच अन्नधान्याचे दर आवाक्यात आल्याची चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे. प्रत्यक्षात नवीन सरकारने अद्याप जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही. किंवा आधारभूत किमतीही कमी-अधिक केलेल्या नाहीत. मात्र काही दिवसांत शेअर मार्केटमधील वाढलेली गुंतवणूक, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने परदेशातून आयात होणा-या डाळी, तेल तूप यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. दर कमी होण्यामागे काहीही कारणे असली तरी महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला काही अंशी दिलासा मिळाला आहे.

घसरणीमागे अनेक कारणे
रुपया मजबूत झाल्याने आयात होणा-या अन्न-धान्य व इतर वस्तूंच्या दरात फरक पडतो. तूर, उडीद, मूग या डाळींच्या किमती यामुळेच कमी झाल्या आहेत. बाजारातील खरेदी पूर्ण झाल्याने ग्राहकी मंदी देखील सुरू आहे. तसेच यंदा उत्पादन चांगले आल्याने दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.
प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन
शेंगदाण्याचे विक्रमी उत्पादन
यंदा महाराष्‍ट्र, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान येथे शेंगदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेंगदाण्याचे दर 58 ते 60 रुपयापर्यंत आले आहेत. तामिळनाडू येथील शेलम येथून साबुदाणा येतो, तेथेही नवीन पीक चांगले आल्याने दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.

मुकेश लोटवाला, शेंगदाण्यांचे घाऊक व्यापारी
मालाचा प्रकार सध्याचे दर मार्चचे दर
उडीद डाळ 68 ते 72 58 ते 62
तूर डाळ 62 ते 66 64 ते 68
मूग डाळ 86 ते 92 98 ते 102
चणा डाळ 32 ते 36 42 ते 45
हरबरा डाळ 32 ते 36 42 ते 44
शेंगदाणा 58 ते 60 70 ते 75
साबुदाणा 67 ते 68 73 ते 74
सोयाबीन तेल 74 76
शेंगदाणा तेल 100 98
तूप (उच्च् प्रतीचे) 80 85
तूप (मध्यम प्रतीचे) 70 80