आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यामुळे रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वे प्रशासनाने जबलपूर कुर्ला सुपरफास्टला ६, हबीबगंज मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशलला तर मुंबई जबलपूर मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडीला अाॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली अाहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना रेल्वेच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला अाहे.

खास कुंभमेळ्यासाठी कुर्ला छपरा एक्स्प्रेस, कुर्ला हावडा एक्स्प्रेस, कुर्ला हबीबगंज एक्स्प्रेस, मुंबई अासनसाेल एक्स्प्रेस, कुर्ला गाेरखपूर एक्स्प्रेस, कुर्ला रक्साेल एक्स्प्रेस, मुंबई गा
ेरखपूर एक्स्प्रेस, कुर्ला जयनगर एक्स्प्रेस, कुर्ला पुरी या गाड्या १० अाॅगस्टपासून सुरू हाेणार अाहेत. अाॅगस्टपासून पुन्हा काही गाड्या सुरू करण्यात येत अाहे. त्या गाड्या ३०
सप्टेंबरपर्यंत धावणार अाहेत. त्यात कुर्ला बनारस एक्स्प्रेस, मुंबई नागपूर एक्स्प्रेस, दादर अाैरंगाबाद, कुर्ला नांदेड एक्स्प्रेस,कुर्ला अाझमगढ एक्स्प्रेस, कुर्ला गाेरखपूर एक्स्प्रेस, कुर्ला
काझीपेठ एक्स्प्रेस, कुर्ला बिदर एक्स्प्रेस, अजनी कुर्ला एक्स्प्रेस, कुर्ला निजामुद्दीन एक्स्प्रेस या
रेल्वेगाड्यांचा समावेश अाहे.
कामाख्या पुणे ही विशेष गाडी साेमवारपासून (ता. २७ जुलै ते अाॅक्टाेबर) या काळात धावणार अाहे, तसेच ही अतिसुपरफास्ट गाडी असून दर साेमवारी ती कामाख्या येथून सुटून
नाशिक येथील रेल्वेस्थानकावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता पाेहाेचणार अाहे.
तपासणी सुरू
कुंभमेळ्याच्यापार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बॅगांची तपासणी केली जात अाहे. प्रतीक्षालय, मुसाफिर खाना, तिकीट खिडकी येथे सीसीटीव्हीद्वारे अारपीएफकडून
पाहणी केली जात अाहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये देखील वे‌ळोवेळी श्वान पथकाद्वारे तपासणी केली जात आहे.

गाड्यांमध्ये गस्त सुरू
दिवसा-रात्रीरेल्वेगाड्यांमध्ये गस्त सक्तीची करण्यात अाली अाहे. स्थानकावर साध्या वेशातील अारपीएफ जवान गस्त घालत अाहेत. सकाळी अारक्षण तिकीट खिडकीवरसुद्धा साध्या
वेशातील जवान लक्ष ठेवून अाहेत, असे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक विनाेदकुमार लांजीवार यांनी सांगितले.