आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवालानंतर मोजणीला होणार प्रत्यक्ष सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळ-जळगाव दरम्यान तिस-या रेल्वेलाइनसाठी रेल्वे प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाकडे मोजणी फी भरली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जमीन मोजणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच रेल्वेलाइनच्या कामाची निविदा प्रक्रियादेखील, मुंबई येथील मुख्यालयात सुरू झाली आहे.

भुसावळ-जळगाव या स्थानकादरम्यान तिस-या रेल्वेलाइनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच या कामासाठी पहिल्या टप्प्यात निधीदेखील मिळाला आहे. एकूण १४० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. तिस-या रेल्वेलाइनसाठी भूसंपादन आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव दिला आहे. तसेच ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे. त्यासाठी रेल्वेने भूसंपादनासाठी रितसर ५० हजारांची ‘फी’ भरली आहे. लवकरच भूसंपादन विभागातर्फे मोजणी सुरू होणार आहे.

प्रांतांकडेदेणार अहवाल :भूसंपादन विभागाच्या कर्मचा-यांकडून सहा महिन्यांत जागेची मोजणी करून, जळगावचे प्रांताधिकारी अभिजित भांडे यांच्याकडे अहवाल दिला जाणार आहे.
वेळेची होईल बचत : भुसावळ-जळगावरेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढली आहे. त्यामुळे भुसावळ रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वी अनेक गाड्या आउटरला थांबवाव्या लागतात. यामुळे प्रवासी गाड्यांना विलंब होतो. मात्र, तिस-या रेल्वेलाइनमुळे ही समस्या सुटण्यास मदत मिळेल. त्यामुळे भुसावळ-जळगाव रेल्वेमार्गावरील गाड्या वेळेवर धावतील.

कामाला मिळणार गती
तिस-यारेल्वेलाइनचा विषय गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. मात्र, या विषयाला आता गती मिळाली आहे. या कामासाठी रेल्वेने भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दिला आहे. नवीन धोरणानुसार नव्याने हा प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव भूसंपादन (टीएलआर) विभागाकडे सोपवला आहे. त्यानुसार जमीन मोजण्यासाठी ‘टीएलआर’ विभागाकडे रेल्वेने रितसर फीदेखील भरली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरातच प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात केली जाणार आहे. तसेच तांत्रिक कामांच्या निविदांचे काम थेट मुंबई मुख्यालयात सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यांत या कामाला गती येणार आहे. याच कामाचा एक भाग म्हणून साकेगाव येथे नवीन रेल्वे पुलाची उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
रेल्वेचा प्रकल्प दृष्टिक्षेपात
१४०
२४
१२
४४
कोटी रुपये अपेक्षित खर्च
किलोमीटर एकूण अंतर
कोटी रुपये निधी प्राप्त
पुलांचे होणार बांधकाम

तिस-या रेल्वेलाइनसाठी जमीन माेजणीचा प्रस्ताव भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवला आहे, तसेच रेल्वेने जमीन मोजणीसाठी फी देखील भरली आहे. जमीन माेजणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष मोजणी होईल. अभिजीत भांडे, प्रांताधिकारी, जळगाव

- निविदा प्रक्रियेससुरुवात : तिस-यारेल्वेमार्गासाठी रेल्वे प्रशासनातर्फे कामाचा ठेका दिला जात आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवडाभरापासून मुंबई मुख्यालयात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्राधान्याने सुरुवात केली जाणार आहे.