आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ६६ हजार लाेकांना उष्माघाताचा धाेका, मनपाकडून उपाययाेजना सुरू,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट अाली असून शहराचे तापमान तब्बल ४३ अंशावर पाेहाेचले अाहे. त्यामुळे लहान मुले वृद्धांना प्रचंड त्रास जाणवत अाहे. तसेच दिवसभर हातमजुरी करून पाेट भरणारे सुमारे ६६ हजार ८३५ लाेकांना उष्माघाताचा त्रास हाेण्याची भीती अाहे. नागरिकांना सावध करण्यासाठी अाता पालिकेच्यावतीने जनजागृती माेहीम राबवून स्वत:ची सुरक्षा करण्याचे अावाहन केले जाणार अाहे.
गेल्या वर्षी उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जिल्ह्यातही नागरिकांचे बळी गेले हाेेते. हा अाकडा देशभरात तब्बल अडीच हजारांवर पाेहचला हाेता. यंदा तर मार्चपासूनच तापमानाचा पारा चढताे अाहे. गुरुवारी शहराचे तापमान तब्बल ४३ अंशापर्यंत पोहचले हाेते. अशा परिस्थितीत जीवाची लाही-लाही हाेत असून रस्ते निर्मनुष्य हाेत अाहेत. अाधीच तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात अनुचित घटना घडू नये म्हणून पालिकेतर्फे काळजी घेतली जात अाहे. पालिकेच्या रुग्णालयात उष्माघात कक्ष उभारला जाणार नसला तरी पालिकेच्या पथकाला येणाऱ्या पाच दिवसांतील तापमानाचा अंदाज अाधीच कळणार अाहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची माहिती जळगावकरांना अाधीच कळू शकणार अाहे. तापमान अधिक राहणार असल्यास पालिकेच्यावतीने शहरात जनजागृती करून नागरिकांना सतर्क राहण्याचे अावाहन केले जाणार अाहे. यासाठी प्रसिद्धीपत्रक छापून ते वाटण्यात येणार अाहेत.
घ्या ही काळजी
- पाणी, ताक किंवा इतर पेय (शीतपये नाहीत) घ्या. उपाशीपाेटी घराबाहेर पडू नका.
- सावलीत थांबा, चालताना झाडांच्या सावलीचा अाधार घ्या.
- तापमान वाढल्याने सुती कपडे घाला. घट्ट गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा.
- शक्यताे महत्वाच्या कामा व्यतिरीक्त कडक उन्हात जाणे टाळावे.
- घराबाहेर उन्हात जाताना डाेक्याला रुमाल बांधावा किंवा टाेपी घालावी, डाेळ्यावर गाॅगल वापरा.
- सतत कष्टाची कामे दुपारएेवजी सकाळीच उरकून घ्यावी.

ही अाहेत लक्षणे
{शरीरावरघामाेळ्या येणे. रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुद्धावस्था.
{खूप घाम येणे तसेच अशक्तपणा वाटणे, ताप येणे, त्वचा काेरडी पडणे.
{डाेके दुखणे जीव मळमळ करणे, भूक लागवणे, चक्कर येणे
३९७ बांधकामक्षेत्रातील कामगार
२६८ शहरातीलप्लास्टिक कचरा गाेळा करणारे
२६५ वीटचुना काम करणारे कामगार
३३० तात्पुरतेस्थलांतरित कामगार
६५४०५ अल्पउत्पन्न गटातील नागरिक
१७० इतरक्षेत्रातील रहिवासी नागरिक
६६८३५ एकूणअसुरक्षित नागरिक
बातम्या आणखी आहेत...