आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘या रब’ चित्रपटावर बंदीची जमाते-ए-उलामाच्‍या कार्यकर्त्‍यांची मागणी.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- ‘या रब’ चित्रपटात एका समाजाच्या धर्मगुरूवर आणि धार्मिकतेचे धडे घेणार्‍या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले आहे. या मुळे एकात्मता, अखंडता आणि बंधुत्वाच्या भावनेला ठेच पोहोचू शकते. शासनाने कोणत्याही स्थितीत या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी भुसावळात जमाते-ए-उलामा या संघटनेने प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे.


नव्याने तयार करण्यात आलेला ‘या रब’ हा हिंदी चित्रपट इतर ठिकाणांप्रमाणे शहरात शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटामध्ये एका समाजाच्या धर्मगुरूवर आणि धार्मिकतेचे धडे घेणार्‍या विद्यार्थ्यांवर आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आले आहे. या मुळे इतर समाजबांधवांमध्ये चुकीचा संदेश पोहोचू शकतो.

हे टाळण्यासाठी ‘या रब’ चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच बंदी आणावी, अशी जमात-ए-उलामा संघटनेची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी प्रांत कार्यालयात निवेदन दिले. अध्यक्ष हाफिज अब्दूल अजिम मकरानी, सय्यद अशरफ अली, हाफिज रफिक अहमद पटेल, मौलवी अब्दुल देशमुख, हाफिज मोहंमद रफिक, शेख रफिक शेख मजिद, डॉ.रफिक अहेमद यांची उपस्थिती होती. दरम्यान, प्रांत कार्यालयात शिरस्तेदारांना निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात आलेल्या अपर पोलिस अधीक्षक एन. अंबिका यांची भेट घेऊन निवेदन दिले.