आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटमध्ये हातसफाई करणाऱ्या चोरास पाठलाग करून पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रचना काॅलनीतील चंद्रा अपार्टमेंटमधील फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून एक चाेर साेमवारी सकाळी ७.४५ वाजता थेट घरात घुसला. मात्र, ताे चाेर पैशांचे पाकीट अाणि माेबाइल घेऊन पळत असताना अावाज झाल्याने फ्लॅटमालकाला जाग अाली. त्यामुळे फ्लॅटमालकाने काॅलनीतील नागरिकांच्या मदतीने चाेरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले.
त्याचे दाेन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.चंद्रा अपार्टमेंटमध्ये डी-मार्टचे व्यवस्थापक अासिफ देशपांडे राहतात. या ठिकाणी त्यांचे दाेन फ्लॅट अाहेत. साेमवारी ते दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा दरवाजा उघडा ठेवून झाेपले हाेते. त्याचा फायदा घेत एक २५ ते ३०वर्षीय चाेरटा घरात घुसला. या वेळी टेबलवर ठेवलेले देशपांडे यांचे पैशांचे पाकीट अाणि माेबाइल उचलून ताे पळ काढत असताना त्याचा अावाज झाल्याने ते जागे झाले. त्यामुळे त्यांनी काॅलनीतील नागरिक रिक्षाचालकाच्या मदतीने चाेरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्या साेबत अाणखी दाेन जण हाेते. त्यापैकी एक अपार्टमेंटच्या अावारात पहारा देत हाेता, तर दुसरा बाजूला असलेल्या दशरथ वाणी यांच्या िकराणा दुकानाच्या अाेट्यावर बसलेला हाेता. त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी नागरिक त्याच्या मागे पळत असल्याचे बघून एकाने नाल्यातून, तर दुसऱ्याने राष्ट्रीय महामार्गाच्या िदशेने पाेबारा केला. नागरिकांनी पकडलेल्या चाेरट्याला एमअायडीसी पाेलिस ठाण्यांच्या ताब्यात िदले अाहे. रात्री उशिरापर्यंत चाेरट्यांची चाैकशी सुरू हाेती.
शहरात अनेक अनाेळखी टाेळ्या लहान मुले घेऊन फिरत अाहेत. मूल अाजारी असून, त्याच्या िकंवा स्वत: मुका असून, उपचारासाठी पैसे लागत असल्याचे सांगून पैसे मागतात. अनेक वेळा तर ते थेट घरात घुसून चाेरी करतात. त्यामुळे नागरिकांनी घरात कुठल्याही अनाेळखी व्यक्तींना प्रवेश देऊ नये, असे अावाहन पाेलिसांनी केले अाहे.

मुका असल्याचे करताेय नाटक
चाेरट्याला एमअायडीसी पाेलिसांनी बाेलता करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ताे मुका असल्याने नाटक करत अाहे. त्यामुळे पाेलिसांना त्याचे नाव गाव कळू शकले नाही.

बॅग पळवणाऱ्यांचा साथीदार?
शहरपाेलिसांनी ३१ जुलै राेजी नटवर मल्टिप्लेक्सजवळून बॅग लांबवणाऱ्या दाेन चाेरट्यांना ताब्यात घेतले हाेते. त्यांचे अाणखी चार साथीदार असल्याचा संशय पाेलिसांना अाहे. त्यामुळे रचना काॅलनीत सापडलेला चाेरटाही त्यांचा साथीदार तर नाहीना याची तपासणी केली जात अाहे.