आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीचे 8 दिवसांवर लग्न असलेल्या पित्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुलीचे अवघ्या अाठ दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या वधूपिता तथा मुख्यालयातील पाेलिस हवालदार यांचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. घरात लग्नाचे मंगलमय वातावरण असताना अचानक घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबीयांना माेठा धक्का बसला अाहे.
इंद्रप्रस्थनगरातील पाेलिस हवालदार संजय सदाशिव विसपुते (वय ५६, रा.इद्रप्रस्थनगर) हे मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत होते. डिसेंबर रोजी त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा पुणे येथील मुलाशी निश्चित करण्यात मुलीचे दिवसांवर लग्न असलेल्या पित्याचा मृत्यू
अालाआहे. अवघ्या आठ दिवसांवर लग्न येऊन ठेपल्याने विसपुते कुटंुबीय पत्रिका वाटणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य इतर नियोजनात व्यस्त होते. शुक्रवारी सकाळी विसपुते यांच्या छातीत कळ आली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालावली हाेती. त्यामुळे विसपुते कुटुंबीयांना माेठा धक्का बसला. तसेच सर्वच पोलिस ठाणे, मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांनी िवसपुतेंच्या जाण्याने शोक व्यक्त केला. विविध व्यासपीठांवरून आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा एक सच्चा दोस्त गमावल्याचे दु:ख अनेकांनी व्यक्त केले. विसपुते यांनी चोपडा, भुसावळ, चाळीसगाव तालुक्यात सेवा बजावली हाेती. त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ चिरंजीव हे विवाहित असून पुण्यात नोकरीस आहेत. तर नववधू ह्या देखील उच्च शिक्षित अाहेत.

बातम्या आणखी आहेत...