आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीच्या दिवशीही एलबीटीचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्राेत असलेल्या एलबीटीची थकलेली रक्कम वसुलीसाठी शेवटचे सात दिवस शिल्लक राहिले अाहेत. अभय याेजनेतून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी भरणा केल्यास तिजाेरीत माेठी रक्कम जमा हाेणार अाहे. त्यासाठी प्रशासनाने शनिवार रविवार या सुटीच्या दिवशीदेखील एलबीटी विभाग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे.

गेल्या महिनाभरात अभय याेजना, थकित भरणा तसेच असेसमेंटच्या कामानिमित्ताने प्रचंड गर्दी झाली हाेती. अभय याेजनेत अातापर्यंत सव्वाकाेटी रुपये जमा झाले अाहेत. १४ अाॅगस्ट ही याेजनेची शेवटीची मुदत अाहे. व्यापाऱ्यांच्या साेईसाठी सुटीच्या दिवशीदेखील कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिली.
व्यापारी महामंडळाचे निवेदन
जिल्हाव्यापारी महामंडळातर्फे शुक्रवारी उपायुक्त जगताप यांना निवेदन देण्यात अाले. ३१ जुलैपर्यंत एलबीटी कर लागू हाेता. कायद्यांतर्गत नाेंदणीधारकाला वार्षिक विवरणपत्र भरणे बंधनकारक हाेते. परंतु, बरेच व्यापारी अशिक्षित असल्याने त्यांनी विवरणपत्र भरलेलेच नाही. तसेच व्यापाऱ्यांनी काेणताही एलबीटी कर भरण्याचे टाळलेले नाही. फक्त कायद्याप्रमाणे विवरणपत्र दाखल केलेले नाही. तरी व्यापाऱ्यांनी वार्षिक विवरणपत्र दाखल केले नसेल, तर त्यांना दंड लावता किंवा कमीतकमी दंड लावून तपासणी करावी, अशी मागणी सचिव ललित बरडिया, एकता असाेसिएशनचे अध्यक्ष बच्चनकुमार चावला, सुनील डेडिया, नीलेश ताथेड, दीपक जैन, हाेलसेल मर्चंटचे शंकरलाल नाथाणी, सेवक माेतीरामाणी, शंकरलाल तलरेजा, इंदर मेहता अादींनी केली अाहे.