जळगाव - ममुराबादनाका परिसरातील संजय शर्मा हा तीन दिवसांपासूनसिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल हाेता. रविवारी दुपारी १२.३० वाजता तहसील कार्यालयाजवळील रेल्वे रुळाजवळ त्याचा मृत्यूदेह आढळून आला. तो सिव्हिलमध्ये दाखल असताना रेल्वेरुळाजवळ कसा गेला याबाबत शंका व्यक्त हाेत आहे.
दाेन वर्षांपासून संजय शर्मा (वय ३२) आजारी हाेता. त्याच्यावरसिव्हिलमध्ये उपचार सुरू हाेते. त्याची आई रविवारी दुपारी १२ वाजता घरी जेवणाचा डबा घेण्यास गेली असता त्या वेळी तोसिव्हिल हाॅस्पिटलमधून बाहेर पडला त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे.
मुलगासिव्हिलमधून गेलाच कसा? असा प्रश्नविचारत जाेपर्यंत दाेषींवर कारवाई हाेत नाही, तोपर्यंत रेल्वे रुळावरून उठणार नाही, अशी भूमिका संजयच्या आईने घेतल्यामुळे पाेलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.