आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गिरणा नदीच्या डाेहात बुडून युवकाचा मृत्यू, मित्रांना खाेल डाेहात जाण्यास राेखले हाेते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सावखेड्यातील गिरणा नदीच्या पात्रात वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून पाेहण्यासाठी गेलेल्या बाळू कुंभार याचा बुडून मृत्यू झाला. बाळूनेच दाेघांना खाेल डाेहात जाताना राेखले हाेते, मात्र त्याचा ताेल गेल्याने ताे बुडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
सावखेडा शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात बाळू ताेताराम कुंभार (वय २२, रा. खंडेरावनगर), हिरालाल विनाेद कुंभार (रा. खंडेरावनगर) अाणि जगन तुळशीराम कुंभार (रा. पिंप्राळा) हे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यासाठी गेले हाेते. वाळू भरल्यानंतर नदीपात्रात असलेल्या डाेहात ते पाेहण्यासाठी गेले. मात्र, या ठिकाणी खाेल खड्डा असल्याचे बाळू कुंभार यांच्या लक्षात अाले. त्याने हिरालाल जगन यांना मागे लाेटले. पण त्याचा ताेल गेल्याने ताे खाेल डाेहात पडला. त्या वेळी मासे पकडण्यासाठी नदी काठावर असलेले बाळू याेगराज पाटील, विशाल सुधाकर सपकाळे यांनी हिरालाल अाणि जगन यांना पाण्यातून अाेढून बाहेर काढले. मात्र, बाळू कुंभारला वाचवू शकले नाही.
पाच तासांनी सापडला मृतदेह...
महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक अाणि सावखेडा गावातील पाेहणाऱ्यांनी बुधवारी दुपारी १२ ते सायंकाळी वाजेपर्यंत बाळू कुंभार याचा शाेध घेतला. सायंकाळी वाजेच्या सुमारास जैन कंपनीच्या पाॅली हाऊसच्या बाजूच्या किनाऱ्यावरील कपारीत बाळू याचा मृतदेह अडकलेला हाेता. या वेळी पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पाेलिस निरीक्षक विजय देशमुख, अतुल वंजारी, राजेंद्र पाटील हे उपस्थित हाेते.
वाळू उत्खननामुळे खड्डे...
सावखेडा शिवारात वाळू उत्खननामुळे गिरणा नदीच्या पात्रात माेठमाेठे खड्डे तयार झाले अाहेत. बाळू कुंभार ज्या ठिकाणी बुडाला त्या ठिकाणी २५ ती ३० फुटांचा खाेल खड्डा असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...