आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गच्चीवर झाेपणे पडले महागात; सत्तर हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील मोहाडी उपनगरातील महादेव नगरातील घरातून चोरट्यांनी रोख रक्कम सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ७० हजारांचा मुद्देमाल लांबवला. उकाड्यामुळे गवळी कुटुंबीय गच्चीवर झाेपले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
शहरातील माेहाडी उपनगरातील तिखी राेडवरील महादेव नगरात स्वराज संभाजी सिंदलिंग (गवळी) यांचे निवासस्थान अाहे. उकाड्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य काल शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घराच्या गच्चीवर झाेपण्यासाठी गेले. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लाेखंडी दरवाजाला लावलेले कुलूप ताेडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील पत्र्याच्या पेटीतील ४० हजार रुपये, २० हजारांचा १० ग्रॅम साेन्याचा नेकलेस, हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे कानातील टाॅप्स, दाेन हजार रुपयांच्या चांदीच्या पाटल्या (अंदाजे ३० भार) असा एकूण ७० हजार रुपये िकमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. गवळी कुटुंबीयांतील सदस्य रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खाली अाले असता त्यांना घरात चाेरी झाल्याचे लक्षात अाले. त्यानंतर त्यांनी पाेलिसांशी संपर्क साधला. पाेलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याबाबत स्वराज गवळी यांच्या तक्रारीवरून माेहाडी उपनगर पाेलिस ठाण्यात अज्ञात चाेरांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास हेडकाॅन्स्टेबल भिकाजी पाटील करीत अाहेत. दरम्यान, पंधरा िदवसांपूर्वीच अशाच पद्धतीने माेहाडीत चाेरीची घटना घडली होती. त्यानंतरही गवळी परिवाराकडून काेणतीही काळजी घेतली गेली नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...