आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले दागिने, पैसे चाेरट्यांनी लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवाजीनगरातील भारतनगरातील घरातून बहिणीच्या लग्नासाठी भिशीच्या पैशांतून खरेदी केलेले ४१ हजार रुपयांचे दागिने आणि १८ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबवल्याची घटना गुरुवारी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे भावाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
भारतनगरातील मशिदीजवळ प्लाॅट नं. मध्ये रिक्षाचालक कबीर खान रऊफ खान (वय २४) हा अाई, पत्नी अाणि बहिणीसाेबत राहताे. बहीण हीनाचे १५ एप्रिल रोजी लग्न अाहे. त्याने लग्नाच्या खर्चासाठी मंगळवारी ८४ हजारांची भिशी घेतली. त्यातून बुधवारी ३७ हजार ५०० रुपयांचे साेन्याचे तर हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने खरेदी केले. त्यानंतर लग्नासाठी इतर साहित्यही खरेदी केले. यात ८४ हजारांमधील हजार रुपये उरले हाेते. अाई अलिशानबी खान या लग्नाचे कपडे खरेदीसाठी शुक्रवारी सुरत जाणार हाेत्या. त्यामुळे त्याने पुन्हा १० हजार रुपये उसनवार अाणले हाेते. ४१ हजार रुपयांचे दागिने अाणि १८ हजार रुपये राेख असा एेवज त्यांनी पहिल्या खाेलीतील लाेखंडी कपाटात ठेवला होता. गुरुवारी रात्री १२.३० वाजेपर्यंत ते गप्पा मारत बसले हाेते. लग्नाचे साहित्य पहिल्या खाेलीत ठेवल्याने तेथे झाेपण्यासाठी जागा नसल्यामुळे सर्वजण स्वयंपाक घराच्या मागील पार्टेशनच्या खाेलीत झाेपले होते. अलिशानबी यांना रात्री १२.४५ वाजता खाेलीत काेणीतरी असल्याचे दिसले. त्यांनी अारडाअाेरड केल्यामुळे सर्वजण जागे झाले. तोवर चोरटा बाथरुमचा दरवाजा बाहेरून लावून पळून गेला. कबीरने चाेरट्याचा पाठलागही केला. मात्र, ताे पसार हाेण्यात यशस्वी झाला. घरात चोरी झाल्याचे पाहून कबीरची काही वेळ शुद्ध हरपली. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास वासुदेव साेनवणे करीत अाहेत.

आठ दिवसावर लग्न
कबीरवर बहिणीच्या लग्नाची जबाबदारी अाहे. यासाठी त्याने सर्व तयारीही केली हाेती. मात्र, चाेरट्यांनी एेनवेळी डल्ला मारल्याने बहिणीचे लग्न कसे हाेणार, याची चिंता त्याला सतावत अाहे. लग्न अाठ दिवसांवर आल्याने पुन्हा एवढे पैसे कुठून उभे करायचे हा प्रश्न त्याच्यासमाेर उभा अाहे. त्यामुळे त्याने पोलिसांना चाेरट्याला त्वरित पकडण्यासाठी विनवण्या केल्या.
याच कपाटात दागिने ठेवले होते.