आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाहुजानगरात चाेरट्यांनी बंद घर फाेडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाहुजानगर परिसरातील मनुदेवी साेसायटीत चाेरट्यांनी बंद घराचे कुलूप ताेडून हजाराेंचा एेवज लंपास केला अाहे. घरमालक शनिवारी दुपारी परत अाल्यानंतर घरात चाेरी झाल्याचे उघडकीस अाले. दरम्यान, यानिमित्ताने शहरात पुन्हा एकादा घरफाेड्यांची मालिका सुरू झाली अाहे.
मनुदेवी साेसायटीतील घर क्रमांक ५९मध्ये कुसुम रमेश वारुळे (वय ६०) या रहातात. त्या १७ सप्टेंबर राेजी पायाच्या उपचारासाठी मुंबई येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलीकडे गेल्या हाेत्या. शुक्रवारी त्या उपचार घेऊन जळगावला परत अाल्या. मात्र, त्या मनुदेवी साेसायटीतच येथे राहणारी त्यांची मुलगी मनीषा दिलीप बाविस्कर यांच्याकडेच रात्री मुक्कामी राहिल्या. दरम्यान, शनिवारी दुपारी २.४५ वाजता त्या घटस्थापना करण्यासाठी स्वत:च्या घरी परतल्या. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचा काेयंडा ताेडून कुलूप बाजूला ठेवलेले दिसले.

त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाट उघडेच हाेते. तर सामान अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. तसेच मधल्या खाेलीतील काेठ्यांमध्ये ठेवलेले साहित्यही चाेरट्याने बाहेर काढून इतरत्र फेकलेले हाेते. कपाटाचे लाॅकर ताेडून चाेरट्यांनी १० हजार रुपये राेख अाणि ६० हजार रुपये किमतीचे दाेन ताेळ्याचे साेन्याचे दागिने असा ७० हजारांचा एेवज चाेरट्यांनी लंपास केला हाेता.
याप्रकरणी वारुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
श्रद्धाकाॅलनीत घरफाेडीप्रकरणी शहर पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी शनिपेठेतील दाेन संशयिताना अटक करून त्यांच्याकडून घरफाेडीतील मुद्देमाल हस्तगत केला अाहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी माेहाडी रस्त्यावरही घरफाेडी झाली हाेती. त्या वेळी एका वृद्धेने दाेन संशयिताना हटकले हाेते. शहर पाेलिसांनी श्रद्धा काॅलनीतील घरफाेडीप्रकरणी अटक केलेल्या एक संशयिताने ही घरफाेडी केली असून या संशयिताला एका वृद्धेने अाेळखले अाहे. त्यांना शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता, अाॅक्टाेबरपर्यंत काेठडी सुनावली.
श्रद्धा काॅलनीतील सरिता बळीराम माळी यांंच्या ‘साहस’ या घराची मागची खिडकीची ग्रील उपटून काढून चाेरट्यांनी लाख ७३ हजार रुपयांचा एेवज लंपास केला हाेता. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्याचे विजयसिंग पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून वासुदेव साेनवणे, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार, अमाेल विसपुते, अक्रम शेख यांच्या पथकाने शुक्रवारी राजेंद्र ऊर्फ साेफराज्या दत्तात्रय गुरव (वय २८, रा. मेस्काेमातानगर) याला अटक केली. त्याने समाधान काेळी (वय २८, रा. काेळीपेठ, कुंभारवाडा, जैनाबाद) याच्यासह अाणखी दाेघांनी मिळून घरफाेडी केल्याची कबुली दिली हाेती. त्यांच्याकडून लाख २७ हजार ५०० रुपयांचा एेवज जप्त केला. सरकारतर्फे अॅड. हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.

राजेंद्रला ओळखले
माेहाडी रस्त्यावरील बालाजी हाइट्स या अपार्टमेंटमध्ये १५ सप्टेंबरला हेमंत चुडामण पाटील (वय ३६) यांच्या घरात घरफाेडी झाली हाेती. त्यात चाेरट्यांनी लाख ५५ हजारांचा एेवज लंपास केला हाेता. विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी बालाजी हाइटसजवळ दाेन २५ ते ३० वयाेगटातील तरुण अाले हाेते. त्या वेळी अपार्टमेंटच्या वाॅचमनच्या सासू पार्वताबाई मरूम यांनी दाेन्ही तरुणांना हटकले हाेते. त्यांनी विसर्जनासाठी अाल्याचे सांगितले. मात्र, त्यांना जाण्यास सांगून पार्वताबाई त्यांच्या कामाला निघून गेल्या. त्यांची नजर चुकवून दाेन्ही संशयित अपार्टमेंटमध्ये घुसून त्यांनी पाटील यांचे घर फाेडले हाेते. श्रद्धा काॅलनीतील घरफाेडीप्रकरणी शहर पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या चाेरट्यांना रामानंदनगर पाेलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी पार्वताबाई यांना संशयित अाेळखण्यासाठी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात बाेलावले हाेते. त्यांनी राजेंद्र याला अाेळखले अाहे. विसर्जनाच्या दिवशी दाेन तरुणांपैकी एक असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले.श्रद्धानगरात घरफाेडी करणाऱ्यांनी केली शनिपेठेतील घरफाेडी करणाऱ्या संशयिताना पाेलिस काेठडी
बातम्या आणखी आहेत...