आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील पडक्या घरातून बंगल्यात प्रवेश; २५ ताेळ्यांचे दागिने लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण परिसरातील अक्सानगरात चाेरट्यांनी शनिवारी रात्री ते मंगळवारी सकाळी १० वाजेदरम्यान अंॅग्लाे उर्दू हायस्कूलचे प्राचार्य यांच्या घरात चाेरी केली. यात त्यांनी २५ ताेळ्यांचे दागिने राेख रक्कम असा लाख १२ हजाराचा एेवज लंपास केला अाहे. चाेरट्यांनी प्राचार्याच्या घरामागील असलेल्या पडक्या घराच्या अावारातून घरात प्रवेश करून ही घरफाेडी केली अाहे. तसेच श्रद्धा कॉलनी परिसरातील नंदनवन कॉलनीतील इंदु रवींद्र सिन्हा यांच्या बंद घर देखील चाेरट्यांनी फाेडले अाहे.

अक्सानगरातील रमाबाई अांबेडकर विद्यालयाजवळील प्लाॅट क्रमांक ४९/१६मधील ‘खुशबू’ बंगल्यात अंॅग्लाे हायस्कूलचे प्राचार्य शेख इकबाल शेख उस्मान हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांची मुलगी शेख फिरदाेस इकबाल शेख ही अाैरंगाबाद येथे विधी विभागाचे (लाॅ) पदव्युत्तर शिक्षण घेत अाहे. अाॅक्टाेबरला सायंकाळी इकबाल शेख अाणि त्यांच्या पत्नी शमीमबानाे हे दाेघे मुलीला भेटण्यासाठी अाणि काही अाराेग्याच्या तपासणी करण्यासाठी अाैरंगाबाद येथे गेले हाेते. मंगळवारी सकाळी १० वाजता इकबाल शेख एकटेचघरी परत अाले त्या वेळी त्यांना पहिल्या मजल्यावरील खाेलीच्या मुख्य दरवाजाबाहेर असलेला लाेखंडी दरवाजा अाणि लाकडी दरवाजा उघडा दिसला, तर दाेन्ही दरवाजांचे कुलूप ताेडून भिंतीवर ठेवलेले हाेते. त्यांनी घरात जाऊन पाहिले त्या वेळी चाेरट्यांनी स्टाेअर रूममधील दाेन्ही कपाटे फाेडून लाॅकर ताेडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले, तर एका बेडरूममधील दाेन कपाटे फाेडून त्यातील अाणि चार बॅगांमधील साहित्य पलंगावर अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. दुसऱ्या बेडरूममध्येही चाेरट्यांनी कपाट फाेडलेले हाेते. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले लाख रुपये राेख अाणि पाच लाख १२ हजार रुपये किमतीचे २५ ताेळ्यांचे दागिने लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समाेर अाले अाहे. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

नंदनवन कॉलनीत बंद घरात चोरी
नंदनवन कॉलनीतील रहिवासी इंदू रवींद्र सिन्हा यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी लाखोंचा एेवज लंपास केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. श्रीमती सिन्हा बाहेरगावी असल्याने याबाबत मात्र गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, शेजाऱ्यांनी हा प्रकार रामानंदनगर पोलिसांना कळवला आहे. सिन्हा या गेल्या दोन दिवसांपासून बाहेर गावी गेल्याने घराला कुलूप लावले होते. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री घराचे दार उघडून आतील मौल्यवान वस्तू रोख रक्कम चोरून नेल्या आहेत. मंगळवारी सकाळी सिन्हा यांचे शेजारी शरद सुधाकर चव्हाण यांना घरातून निघताना शेजारील घराचे दार उघडे दिसले. डोकावून पाहिले असता कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे आढळून आले. यावर चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

कंपाउंडमध्ये चाेरट्यांच्या पायांचे ठसे
शेखयांच्या घराच्या मागच्या बाजूला अनेक वर्षांपासून एक घर बंद स्थितीत पडलेले अाहे. त्या पडक्या घरातून चाेरटे शेख यांच्या कंपाउंडमध्ये अाले अाहेत. त्या ठिकाणी चाेरट्यांच्या पायांचे ठसे अाहेत. त्यानंतर चाेरट्यांनी बाजूला असलेल्या दाेन्ही घरांच्या बाहेरून कड्या लावून त्यांच्या जिन्यावर चढले. जिन्यावरून शेख यांच्या बाल्कनीत चढून त्यांनी दरवाजाचे कुलूप ताेडून चाेरी केली अाहे. चाेरटे परत जातानाही त्याच रस्त्याने गेले अाहेत. कारण जाताना बाजूच्या घराच्या जिन्याच्या पायऱ्यांवर शेख यांच्या घरातून चाेरलेल्या त्यांच्या घरातील चिल्लरचा डबा विसरून गेले अाहेत.

पडकी घरे ठरताहेत धाेकादायक
घरांच्या अाजूबाजूला असलेली बंद पडकी घरे धाेकादायक ठरताहेत. कारण चाेरटे त्यांचा उपयाेग घरात घुसण्यासाठी करताहेत. सिंधी काॅलनीतील अपार्टमेंटमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या चाेरीत चाेरट्यांनी अशाच पडक्या घरातून प्रवेश केला हाेता. रविवारी रात्री झालेली हायवेदर्शन काॅलनीतील चाेरी, ३० सप्टेंबरला मनुदेवी साेसायटीत झालेली चाेरी अाणि साेमवारी झालेल्या चाेरीतही चाेरट्यांनी पडक्या घराचा अाधार घेत बाजूच्या घरात प्रवेश करून चाेऱ्या केल्या अाहेत.
जळगाव शहरातीलघरफाेड्यांचे गुन्हे १०० टक्के उघड करा, अन्यथा तपासाधिकाऱ्यांसह गुन्हे शाेध पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईला सामाेरे जावे लागेल, असा इशारा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी दिला. तसेच जे कर्मचारी चांगले काम करतील त्यांना बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
घरफाेड्यांच्या पार्श्वभूमीवर पाेलिस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पाेलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अाणि गुन्हे शाेध शाखेच्या कर्मचाऱ्यांची मंगळवारी दुपारी वाजता बैठक घेण्यात अाली. या वेळी डाॅ. सुपेकर यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत विविध सूचना केल्या.

कामचुकारांंच्या बदल्या : पाेलिसठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी घरफाेड्या हाेत असलेल्या भागांचा अभ्यास करून नागरिकांमध्ये जागृती करण्यास बैठकी घ्याव्यात. चाेऱ्या हाेणाऱ्या भागांत गस्तीचे प्रमाण वाढवावे, रात्रीसह दिवसाही गस्त घालावी, सुरक्षारक्षक,सीसीटीव्ही बसवण्याचे अावाहन करावे, पाेलिस मित्रांना साेबत घ्यावे, हिस्ट्रीशीटरची तपासणी करावी, फक्त तपासणी करून साेडून देता त्याच्यावर लक्ष ठेवावे, त्यांच्याकडून माहिती मिळवावी, अशा सूचना डाॅ. सुपेकर यांनी केल्या. तसेच गुन्हे उघड करण्यात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे अादेशही त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांना दिले. गुन्ह्याचा तपास का हाेत नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना कारणे सांगता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम दाखवावे. असे अपर पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील यांनी सांगितले. साेनसाखळी चाेरीवर ज्या पद्धतीने नियंत्रण अाणले. त्याच पद्धतीने घरफाेड्यांवरही नियंत्रण अाणून पाेलिसांचा प्रभाव काय असताे? ते दाखवून द्या. असे उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी सांगितले. डीबीपथकाच्या बैठकीत उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिसरातील हिस्ट्रीशीटरची माहिती, नावे विचारली. त्या वेळी काही कर्मचारी साेडले तर काेणालाच माहिती सांगता अाली नाही. त्यामुळे संतापलेल्या सांगळे यांनी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.
बातम्या आणखी आहेत...