आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब झाेपले कुलरच्या थंडगार हवेत; खाेलीतून लंपास झाले ११ ताेळे साेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लग्न साेहळ्याहून थकून अालेले कुटुंब कुलरच्या हवेत एकाच खाेलीत गाढ झाेपेत असताना चाेरट्यांनी त्याच खाेलीतून अगदी सावधपणे एका टेबलवर ठेवलेल्या दोन पर्स दोन पँट लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री इंद्रप्रस्थनगरात घडली. जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्याच्या घरात ही चाेरी झाली असून चाेरट्यांनी चाेरलेल्या दाेन्ही पर्समध्ये ११ तोळे सोने हजार रुपये रोख, दोन पँटमधील साडेसहा हजार रुपये होते. २५ मे राेजी देखील शहरात तीन ठिकाणी कुटुंबीय घरात झाेपलेले असताना चाेरट्यांनी चाेरी केली हाेती. या घटनेमुळे पाेलिसांचा चाेरट्यांवरील वचक कमी झाल्याने ते बिनधास्त चाेऱ्या करीत अाहे. 
 
इंद्रप्रस्थनगरात जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक हेमंत दत्तात्रय बडगुजर हे राहतात. हेमंत बडगुजर त्यांच्या पत्नी सुनंदा, मुलगा अतुल, मुलगी दीपाली नातू आदित्य हे सर्वजण २६ मे रोजी अमळनेर येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी स्वत:च्या चारचाकीने गेले होते. लग्नसाेहळा आटोपून शनिवारी रात्री १० वाजता ते सर्वजण घरी परतले. थकव्यामुळे त्यांनी रात्री जेवणही केले नाही. सुनंदा बडगुजर यांनी लग्नात घातलेले दागिने काढून त्यांनी दोन पर्समध्ये ठेवले होते. ती पर्स कॉटच्या शेजारीच असलेल्या एका लहान टेबलावर ठेवली होती. उन्हामुळे प्रचंड थकवा अालेला असल्यामुळे रात्री कुलर असलेल्या एकाच खोलीत सर्वजण झाेपले. तत्पूर्वी त्यांनी मुख्य दरवाजा उघडाच ठेवला होता. तर लोखंडी ग्रीलच्या दरवाजाला आतून कुलूप लावले होते. हे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचा संशय आहे. चाेरट्यांनी दोन पर्स, हुकला अडकवलेली हेमंत बडगुजर अतुल यांची पंॅट लांबवली. दोन्ही पर्समध्ये दोन मंगल पोत, दोन जोड कानातले, हार, असे एकूण ११ तोळे सोन्याचे दागिने चार हजार रुपये रोख होते. हेमंत बडगुजर यांच्या पंॅटमध्ये हजार रुपये तर अतुलच्या पंॅटमध्ये ५०० रुपये काही महत्त्वाची कागदपत्रे, एटीएम कार्ड होते. चाेरीनंतर बँकेत संपर्क साधून त्यांनी एटीएम कार्ड ब्लॉक करून घेतले. चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला आहे. चोरट्यांनी कुलूप ताेडून ते सोबत नेलेले आहे. कुलूप त्यांनी कशाने ताेडले याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सीसीटीव्ही नसल्याने अडचण 
बडगुजर राहतात त्या परिसरात दोन घरांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; परंतु त्यांच्या शेजारी राहत असलेल्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे. तर जो सुरू आहे तो लांब अंतरावर असल्याने त्यातील फुटेज पोलिसांना मिळू शकले नाही. रविवारी घटनास्थळी स्वानपथकाला बोलावण्यात आला होता; परंतु श्वानाने घरात अंगणातच फेऱ्या मारल्या. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली. 

१०ग्रॅम वजनाच्या पाटल्या सुरक्षित 
रविवारीसकाळी वाजता हेमंत बडगुजर हे झोपेतून जागे झाले. त्यांना लोखंडी ग्रीलचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे त्यांना पत्नी सुनंदा घराबाहेर असल्याचे वाटून ते बाहेर गेले; परंतु सुनंदा या घरातच होत्या. हेमंत बडगुजरांनी त्यांना झोपेतून उठवले. त्यांना घराच्या अंगणात एक पर्स फेकलेली दिसून आली. याच वेळी सुनंदा बडगुजर यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी पर्स ठेवलेला टेबल गाठून तपासणी केली. तेथे दोन्ही पर्स नव्हत्या. त्यानंतर सर्व कुटंुबीयांनी घरात तपासणी केली असता, चोरट्यांनी दोन पर्स, दोन पंॅट नेल्याचे आढळून आले. तर एक पर्स साेबत तर दुसरी अंगणात फेकून चाेरटे पसार झाले हाेते. चोरट्यांनी पाच पैकी तीन खोल्यांमध्ये शोधाशोध केली आहे. सोने ठेवलेली पर्स टेबलावरच मिळून आल्यामुळे त्यांनी कपाट, ड्रॉवर उघडले नाही. विशेष म्हणजे बडगुजर कुटुंबीय झोपलेले असताना त्यांनी सर्वांना ओलांडून इतर खोल्यांमध्ये शोधाशोध केली आहे. यादरम्यान कोणालाही जाग आली नाही. तसेच याच खोलीत एका बाजूूला भिंतीवर अडकवलेल्या फॅन्सी झोल्याच्या खिशात सुनंदा बडगुजर यांच्या १० ग्रॅम वजनाच्या पाटल्या होत्या. सुदैवाने चोरट्यांना शोधता अाल्यामुळे पाटल्या सुरक्षित राहिल्या. 

माहेरवाशीण मुलीचे सोने गेले हो साहेब... : हेमंतबडगुजर यांचा मुलगा अतुल मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर मुलगी दीपाली हिचा विवाह पुणे येथील गणेश बडगुजर यांच्याशी झाला असून त्या सध्या पुण्यालाच असतात. लग्नासाठी ही माहेरवाशीण जळगावला आली असताना तिचे ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले आहे. तसेच सुनंदा बडगुजर या ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करीत असून पै-पै गोळा करून आपण सोने खरेदी केले होते. चाेरट्यांना पकडून ते परत मिळवून द्या, अशी विनंती बडगुजर कुटुंबीयांनी पोलिसांना केली. 

एक दिवसाआड चोरी 
२५मे राेजी रात्री शाहूनगर, शिवाजीनगर केसी पार्क या ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यानंतर एक दिवसाअाड शनिवारी रात्री बडगुजर यांच्या घरी चाेरी झाली आहे. या चारही घटनांमध्ये चाेरट्यांची एमओबी जवळपास एकसारखीच आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...