आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथवाडा परिसरात चोरी करणारा चोरटा अखेर जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नाथवाडापरिसरातील मदनलाल जैन यांच्या घरात चोरी करणाऱ्या चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी कंजरवाडा येथून साेमवारी अटक केली. हर्षवर्धन पवार (वय २२, रा.गेंदालाल मिल) असे चोरट्याचे नाव आहे.
हर्षवर्धनने जैन यांच्या उघड्या घरात प्रवेश करून ७० हजार रुपयांची रोकड चोरली होती. आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्यासह गुन्हे शाेध पथकाचे रवी नरवाडे, राजेश मेढे, अनिल पाटील अल्ताफ पठाण यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून पवारला सापळा लावून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
चोरीच्या पैशांतून घेतली रिक्षा
पवारनेचोरी केलेल्या ७० हजार रुपयांपैकी ४२ हजार रुपये डाऊन पेमेंट भरून नवीन ऑटोरिक्षा घेतली आहे. तसेच उर्वरित पैशांतून रक्षाबंधनला बहिणीस ड्रेस घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी नवीन रिक्षा हस्तगत केली आहे.