आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी चोराने चुलत भावालाही फसवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नाशिक,ठाणे आणि मुंबई येथून चोरी केलेल्या चारचाकी गाड्या जिल्ह्यात विकणाऱ्या किशोर पिरन पाटील (रा. मेहरगाव, ता. अमळनेर) याने त्याचा चुलतभाऊ अमोल रमेश पाटील (वय २६, रा. अमळगाव, ता. अमळनेर) याची टाटा इंडिका विकून चोरीची तवेरा गाडी देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी किशोर याच्यावर पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
किशाेर याने सात महिन्यांपूर्वी अमोलची इंडिका (एमएच- ०५, एएस- ०३८२) दोन लाखांत विकून दुसरी गाडी आणून देतो असे सांगून घेऊन गेला. एक महिन्यांनंतर तवेरा (एमएच- १५, डीएम- ८७४९) ही गाडी पाच लाखांत त्याने अमोलला विकली. त्यासाठी अमोलने किशोरला दीड लाख रुपये रोख दिले होते.

गाडी नावावर केल्यानंतर ३.५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. कागदपत्रांचा तगादा लावल्यानंतर काही दिवसांनी कलर झेरॉक्सच्या प्रति किशाेरने अमोलला दिल्या. त्यानंतर २८ जुलैला अमोलच्या घरी पोलिस आले, तेव्हा त्याने ही गाडी किशोरकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी ती तवेरा जप्त केली आहे.
मारवड ठाण्यात गुन्हा
किशोरनेइंडिकाचे काय केले? ते पोलिसांना सांगितले नव्हते. अधिक शोध घेतला असता किशाेर याने दीपक अमृत पाटील (रा. पळासदळे, ता. अमळनेर) यांना इंडिका विकल्याचे समजले. ती विना क्रमांकाची गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चेचीस नंबरच्या जागेवर पत्रा वेल्डिंग करून त्या जागी बनावट चेचीस नंबरही त्यावर टाकलेला दिसून आला. तसेच इंजिनची नंबरप्लेटही काढून टाकण्यात आली होती. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू हाेते.