आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणरणत्या उन्हात घरफोड्यांचा ताप, दुपारी 5 तासांत फोडली 4 घरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रणरणत्या उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे पाहून चाेरट्यांनी शनिवारी दुपारी पाच तास शहरात धुमाकूळ घातला. त्यांनी गजानन, भगीरथ, श्रीकृष्ण काॅलनी अाणि चक्रवर्तीनगरातील चार अपार्टमेंटमधील फ्लॅट फाेडून लाखांचे दागिने, १० हजाराचे चांदीचे भाडे ३५ हजार रुपये राेख लंपास केले. चारही ठिकाणी चाेरीची पद्धत एकसारखी असल्याने एकाच टाेळीने या चाेऱ्या केल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. सुट्यांमध्ये अनेक जण बाहेरगावी जातात. ही संधी हेरून चाेरट्यांनी ही हातसफाई केली. कारण दिवाळीच्या सुट्यांमध्ये शहरात अनेक ठिकाणी चाेऱ्या झाल्या हाेत्या. या प्रकाराची पाेलिस प्रशासनाने दखल घेऊन रात्रीसाेबत दिवसाचीदेखील गस्त वाढवणे गरजेचे अाहे.
चारही ठिकाणी चाेरीची पद्धत सारखी हाेती. चाेरट्यांनी फ्लॅटचा काेयंडा ताेडून बेडरूममधील कपाटे फिंगर प्रिंट न उमटवता तोडली. पाेलिसांनी चाेरी झालेल्या चार ठिकाणी फिंगर प्रिंट एक्स्पर्टला बाेलावले. मात्र, एकाही ठिकाणी चाेरट्याचे फिंगर प्रिंट मिळाले नाही.
सर्व ठिकाणी चोरीची एकच ‘एमअाेबी’
सुट्यांची साधली संधी
एप्रिल,मे महिन्यात सुट्या लागल्यानंतर नागरिक बाहेरगावी जातात. ही संधी हेरून चाेरट्यांनी शनिवारी धुमाकूळ घातला. गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अन‌् नाेव्हेंबर २०१५मध्ये दिवाळीच्या सुट्यांतदेखील चाेेरट्यांनी अनेक ठिकाणी चाेऱ्या केल्या हाेत्या. त्यात त्यांनी अपार्टमेंटलाच लक्ष्य केले हाेते.

चाेरी झाल्यानंतर येथे संपर्क साधा
चाेरीनंतरप्रथम १०० क्रमांकावर फाेन करावा. ताे लागला नाही तर पोलिस नियंत्रण कक्षातील ०२५७ - २२२३३३३ या क्रमांकावर फाेन करा. तसेच शहर- २२२९६९३, जिल्हापेठ -२२२९७३३, एमअायडीसी- २२१०५००, रामानंदनगर- २२८२८६४, शनिपेठ - २२२५३४३, तालुका- २२५३००२ पोलिस ठाण्यातही संपर्क साधता येईल.

द्राैपदीनगर परिसरातील चक्रवर्तीनगरातील मधुबन अपार्टमेंटमधील राजमल नवाल यांच्या फ्लॅटमध्ये बँक अाॅफ महाराष्ट्रचे लेखापरीक्षक नंदकुमार बुरुडे राहतात. वैद्यकीय तपासणीसाठी ते नागपूर येथे गेलेले अाहेत. शनिवारी दुपारी ते वाजेदरम्यान त्यांच्या फ्लॅटचा कडी-काेयंडा ताेडून चाेरट्यांनी बेडरूममधील कपाटातील १५ हजार रुपये राेख अाणि ग्रॅम साेन्याची १० हजाराची साेनसाखळी लंपास केलीे. सायंकाळी ५.४५ वाजता विक्रीकर िवभागाचे उपायुक्त रामलाला पाटील यांनी एका संशयिताला अपार्टमेंटमधून बाहेर जाताना पाहिले. या संशयिताला काही दिवसापूर्वी लिफ्टचे साहित्य चाेरताना पकडून चांगलीच धुलाई केली होती. मात्र ताे संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला.

चक्रवर्तीनगरातील मधुबन अपार्टमेंट :
साेनसाखळी ची चाेरी
चोरट्यांचा ‘समर व्हॅकेशन धमाका’
हितेश शहा यांच्या घरातील बेडरूममधील तोडलेले कपाट.

मधुबन अपार्टमेंट : चारकपाटांतून १२ तोळे सोने लंपास
गजानन काॅलनीतील मधुबन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २मध्ये बॅटरींचे विक्रेते हितेश नरेंद्र शहा राहतात. शनिवारी सकाळी शहा त्यांच्या युनिटी चेंबरमधील दुकानात गेले हाेते. त्यानंतर दुपारी १२.१५ वाजता शहा यांची पत्नी चेतना या फ्लॅटला कुलूप लावून समाेरच्या फ्लॅट क्रमांक ४मध्ये गेल्या. दुपारी १.३० वाजता हितेश शहा हे जेवणासाठी घरी अाले. त्या वेळी त्यांना फ्लॅटला कुलूप लावलेले दिसले नाही. त्यामुळे पत्नी चेतना यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी कुलूप लावल्याचे सांगितल्याने त्यांना चाेरीची शंका अाली. त्यामुळे फ्लॅटमध्ये जाऊन बघितले तेव्हा त्यांना दाेन्ही बेडरूममधील प्रत्येकी दाेन असे चार कपाट उघडलेले दिसले. त्यापैकी एका बेडरूममधील कपाटांमध्ये चाेरट्यांना काहीच सापडले नाही, तर दुसऱ्या बेडरूममधील एका कपाटाला चाव्या हाेत्या. त्याद्वारे चाेरट्यांनी लाॅकर उघडून १५ हजार लंपास केले. तसेच दुसऱ्या कपाटातील लाख रुपये किमतीचे १२ तोळे साेन्याचे अर्धा किलाे चांदीचे दागिने लंपास केले. चाेरट्यांनी जाताना बेन्टेक्सचे दागिने सुटे पैसे पलंगावरच टाकून दिले हाेते. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसांत तक्रार देण्यात अाली अाहे. दरम्यान, दुपारी १२.४५ वाजता अपार्टमेंटमध्ये एक तरुण माेटारसायकलवर बसलेला हाेता. त्याला एका महिलेने हटकले होते.

सीसीटीव्ही,सुरक्षारक्षकच नाही
चारहीअपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षारक्षक नाहीत. ही संधी साधून चाेरट्यांनी चाेरी केली अाहे. त्यामुळे नागरिकांनी सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे.

एकाही ठिकाणी फिंगर प्रिंट मिळाले नाही
गणेश काॅलनीतील भगीरथ काॅलनीमधील कमल व्हिला अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ५मध्ये अॅड.जयप्रकाश राजेंद्र महाजन राहतात. शाळांना सुट्या असल्याने अॅड.महाजन यांची पत्नी मुलासह नरवेल (अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) येथे गेलेल्या हाेत्या. तसेच अॅड.महाजन हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या खान्देश मिल काॅम्प्लेक्समधील कार्यालयात गेले हाेते. त्यानंतर ते दुपारी २.४५ वाजता घरी परत अाले तेव्हा त्यांना फ्लॅटचा काेयंडा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी अात जाऊन पाहिले तर चाेरट्यांनी बेडरूममधील दाेन कपाटे फाेडून हजार रुपये राेख लंपास केल्याचे दिसले. महाजन यांची पत्नी गावाला दागिने साेबत घेऊन गेल्याने ते वाचले.
अॅड. महाजन यांच्या घरातील कपाटावरचे ठसे तपासताना तज्ज्ञ.

कमल व्हिला अपार्टमेंट : रोकडगेली, पण दागिने वाचले
कृष्णा अपार्टमेंट १०हजारांचे चांदीचे भांडे गायब
गणेश काॅलनीतीलश्रीकृष्ण काॅलनीतील कृष्णा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ९/१०मध्ये दीपक देशमुख राहतात. ते गुरुवारी लग्नासाठी खामगाव येथे गेले होते. शनिवारी दुपारी वाजता अपार्टमेंटमधील काही जणांना अावाज अाला; पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. थाेड्या वेळानंतर एक ब्राेकर देशमुख यांचा फ्लॅट एका ग्राहकाला दाखवण्यासाठी घेऊन अाला. त्या वेळी समाेरच्या फ्लॅटमध्ये राहणारे प्रवीण साेनवणे यांना देशमुखांचा फ्लॅट उघडा दिसला. अात जाऊन बघितल्यानंतर त्यांना चाेरी झाल्याचे लक्षात अाले. त्यामुळे त्यांनी फ्लॅटशेजारी राहणारे दीपक देशमुख यांचे भाऊ संताेष देशमुख यांना बाेलावले. चाेरट्यांनी घराचे कुलूप दाेन कपाटे फाेडली हाेती. देशमुख हे लग्नासाठी जाताना साेबत दागिने राेख रक्कम घेऊन गेले हाेते. त्यामुळे कपाटात १० हजाराचे चांदीचे भांडे होते. ते चाेरट्यांनी चाेरून नेले अाहे.