आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस चाैकीपासून पन्नास फुटांवर रात्रभर मृतदेह पडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा पाेलिस दलाच्या शहरातील पाेलिस चाैक्या जणू शाेभेच्या वस्तू झाल्या अाहेत. अाैद्याेगिक पाेलिस ठाण्यांतर्गत येणारी इच्छादेवी पाेलिस चाैकीच्या समाेर ५० पावलांवर (फूट) रात्रभर पडून असलेल्या वृद्धाला दवाखान्यात नेण्याची माणुसकीही पाेलिसांनी दाखवली नाही. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत वृद्धाचा मृतदेह पडून हाेता. तर शनिपेठ पाेलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुभाष चाैकीच्या मागे अवघ्या ८० पावलांवर भरबाजारातील दुकान चाेरट्यांनी फाेडले. यावरून पाेलिस चाैक्यांच्या कारभाराचे वाभाडे निघत अाहेत.
इच्छादेवी मंदिराच्या समाेरच्या बाजूला शुक्रवारी रात्रीपासून गुलाब माेतीराम माेरे (वय ५५, रा. रामेश्वर काॅलनी) हे बेशुद्धावस्थेत पडून हाेते. त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रभर शाेधाशाेध केली. मात्र, ते मिळून अाले नाही. शनिवारी सकाळी १० वाजता माेरे यांचा मुलगा िदनेशला वडील इच्छादेवी मंदिराजवळ पडलेले असल्याची माहिती मिळाली. त्याने जाऊन त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घाेषित केले. हे घटनास्थळ इच्छादेवी पाेलिस चाैकीच्या अवघ्या ५० पावलांवर अाहे. मात्र, या पाेलिस चाैकीत कर्तव्यास असलेल्या एकाही कर्मचाऱ्याला या मृत व्यक्तीविषयी चाैकशी करण्याची इच्छा झाली नाही.

दाणा बाजारात पीपल्स बंॅकेच्या मागच्या गल्लीत दुकान क्रमांक १६१ मध्ये साखरेचे घाऊक विक्रेता अानंद जैन यांचे श्री श्रीमाळ ट्रेडर्स नावाचे दुकान अाहे. त्याच्या बाजूला कन्हैय्यालाल सतरामदास मलंगवाणी (रा. अादर्शनगर) यांचे हमारा ट्रान्सपाेर्टचे कार्यालय अाहे. तीन चाेरट्यांनी शनिवारी पहाटे ३.३० वाजता अगाेदर हमारा ट्रान्सपाेर्टच्या कार्यालयाचे शटर टॅमीने उचकावून अर्धे उघडले. कार्यालयात प्रवेश करून चाेरट्यांनी कपाट फाेडले. मात्र, त्या िठकाणी चाेरट्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी माेर्चा बाजूला असलेल्या श्रीश्रीमाळ ट्रेडर्सकडे वळवला. दुकानाचे शटर त्याच पद्धतीने उचकावून अात प्रवेश केला. दुकानातील टेबलचे ड्रावर ताेडले. मात्र, त्या िठकाणीही चाेरट्यांना काहीच सापडले नाही. चाेरट्यांनी दाेन्ही दुकानातील इतर काेणत्याही वस्तूला हात लावला नाही. त्याचवेळी या परिसरात गुरखा िफरत हाेता. त्याने तीन जणांना पळताना बघितले. त्याने त्यांचा पाठलागही केला. मात्र, चाेरटे त्याच्याही हाती लागले नाही. त्याने दुकानाचे मालक जैन यांना तत्काळ फाेन करून माहिती िदली. त्यांनी शनिवारी पहाटे वाजता येऊन दुकान उघडून बघितले. मात्र, काहीही चाेरी झाले नसल्याचे समाेर अाले. दुकान फाेडल्याच्या काही मीटर अंतरावर सुभाष चाैक पाेलिस चौकी अाहे. तरीही चाेरट्यांनी दुकाने फाेडण्याची हिंमत दाखवली. याबाबत परिसरात चर्चा सुरू हाेती.

११ पैकी चाैक्या सुरू
शहर पाेलिस ठाण्यांतर्गत शाहूनगर, शिवाजीनगर अाणि गेंदालाल मिल परिसरात पाेलिस चाैक्या अाहेत. रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत रामानंदनगर, गणपतीनगर, महाबळ, पिंप्राळा या चार चाैक्यात अाहेत. शनिपेठच्या हद्दीत भिलपुरा अाणि सुभाष चाैक तर एमअायडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत इच्छादेवी अाणि तांबापुरा अशा दाेन पाेलिस चाैक्या अाहेत. शहरात एकूण ११ पाेलिस चाैक्या अाहेत. त्यापैकी सुभाष चाैक, रामानंदनगर, गणपतीनगर, तांबपुरा अाणि इच्छादेवी चाैकातील चाैक्या उघड्या असतात. उर्वरित चाैक्यांना कायम कुलूपच लावलेले असते.