आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गच्चीवरची झोप महागात, शहरात 2 ठिकाणी घरफाेडी, 65 हजारांचा एेवज लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरफाेड्यांचा धमाका मंगळवारीही कायम हाेता. दूध संघाजवळील राजमालतीनगरातील एका घरात नूतन मराठा महाविद्यालयाजवळील हाॅटेल रामामधून मंगळवारी मध्यरात्री चाेरट्यांनी चाेरी केली. यात त्यांनी ६५ हजारांचा एेवज लंपास केला. दरम्यान, दाेन्ही ठिकाणावरील नागरिक गच्चीवर झाेपले असल्याची संधी साधून चाेरट्यांनी हातसफाई केली. दरम्यान, शहरात गेल्या सहा दिवसांत सात ठिकाणी चाेरट्यांनी डल्ला मारला अाहे.
चोरट्यांनी फोडलेले कपाट सीसीटीव्हीतील हालचाली
{ पहाटे ३.४४वाजतामागच्या भिंतीवरून चोरट्याचा हॉटेलमध्ये प्रवेश.
{ पहाटे ३.४६वाजतावेटर झाेपलेल्या वरच्या खाेलीत जाऊन टेहळणी.
{ पहाटे ३.४७वाजताकाऊंटरमधील ड्राॅवर फाेडून त्यातून साडेसात हजार काढले.
{ पहाटे ३.४८वाजताचाेरटा पसार.

नूतन मराठा महाविद्यालयाच्या बाजूला अाणि पाेलिस लाइनसमाेर सतीश रामदास नारखेडे यांच्या मालकीचे हाॅटेल रामा अाहे. मंगळवारी ग्राहक गेल्यानंतर वेटर अाणि इतर कर्मचाऱ्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत जेवण केले. त्यानंतर ते रात्री १.४५ वाजेपर्यंत गप्पा मारत बसले हाेते. त्यानंतर सर्व कर्मचारी वरच्या मजल्यावर झाेपले. बुधवारी सकाळी ९.३० वाजता हाॅटेलचे व्यवस्थापक अाल्यानंतर त्यांना काऊंटरचे ड्राॅवर ताेडलेले दिसले. चाेरट्यांनी गल्ल्यातील साडेसात हजार अाणि ३० रुपयांची चिल्लर गायब अाहे. याप्रकरणी व्यवस्थापकाने हाॅटेलचे मालक नारखेडे यांना माहिती दिल्यानतंर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

जिल्हा दूध संघाच्या बाजूला असलेल्या राजमालतीनगरातील प्लाॅट क्रमांक १२ मधील रेल्वेचे मुकादम मुकेश ताेताराम जाधव हे मंगळवारी रात्री ११ वाजता गच्चीवर झाेपण्यासाठी गेले. बुधवारी सकाळी जाधव यांच्या पत्नी अाशाबाई या खाली अाल्या. त्या वेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात लाेखंडी कपाट उघडे हाेते. लाॅकर ताेडून चाेरट्यांनी ३० हजार रुपये राेख, २८ हजारांचे दागिने, एक घड्याळ एक माेबाइल लांबवला. तसेच चाेरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे.

श्वानपथकाने काही अंतरापर्यंत काढला माग : चाेरीकेल्यानंतर चाेरटे घरातील बॅग साेबत घेऊन गेले हाेते. पाेलिसांच्या श्वानपथकाने चाेरट्यांचा काही अंतरापर्यंत माग काढला. त्यावेळी पाेलिसांना राजमालतीनगरापासून जवळ असलेल्या एका शेतातील विहिरीत बॅग अाणि दागिने ठेवलेल्या छोट्या डब्या फेकून दिलेल्या दिसल्या.
बातम्या आणखी आहेत...