आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूटीस्वाराला चकवून हिसकावले ४८ हजार, शाहू कॉम्प्लेक्स परिसरात भरदविसा घडलेली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव - शाहूकॉम्प्लेक्स जवळील कृष्णा हॉस्पिटल समोर गुरुवारी दुपारी १.१० वाजता मोटारसायकलीवर आलेल्या दोन तरुणांनी स्कूटीवर जात असलेल्या प्रौढाचे लक्ष विचलित करून ४८ हजार रुपये असलेली बॅग लांबवली. या घटनेमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

मुंदडानगरातील तुळशीराम पंढरीनाथ खडके (वय ५१) यांना इंद्रधनू बहुउद्देशीय संस्थेने ४८ हजार रुपयांचा सेंट्रल बँकेचा धनादेश दिला होता. गुरुवारी दुपारी १२.५० वाजता खडके हे धनादेश वटवण्यासाठी नवीपेठेतील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेत गेले होते. धनादेश वटवल्यानंतर ते स्कूटीने (एमएच १९ डब्ल्यू ३८३३) घरी जाण्यासाठी निघाले. खडके यांनी पैसे एका हिरव्या रंगाच्या चामड्याच्या बॅगत ठेवले होते. ती बॅग त्यांनी स्कूटीच्या पुढे असलेल्या हुकला अडकवली होती. शाहू कॉम्प्लेक्सजवळील कृष्णा हॉस्पिटलसमोर त्यांच्यामागून काळ्या बजाज पल्सर मोटारसायकलवर २५ ते ३० वयोगटातील दोन तरुण आले. त्यांनी खडके यांना मागे तुमची काहीतरी वस्तू पडल्याचे सांगून लक्ष विचलित केले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून एक हात हँडलला धरून मागे वळून पाहिले. तितक्यात मोटारसायकलच्या मागे बसलेल्या तरुणाने खडके यांच्या हाताला झटका देत बॅग हिसकावली. याप्रकरणी खडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायसोनी नगरातील वृद्धेची सोनसाखळी लांबवली
रायसोनीनगरातीलजयश्री पाटील (वय ६१) या गुरुवारी सायंकाळी वाजता लांडोर खोरी जवळील बजरंग चौकात बसलेल्या होत्या. त्यांच्या समोर दोन तरुण काळ्या रंगाची विना क्रमांकाची बजाज पल्सर गाडीवर बसले होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले होते. परिसरात कोणीच नसल्याचे बघून त्यांनी पाटील यांच्याजवळ वेगाने मोटारसायकल घेऊन येत त्यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील तीन पदरी सोनसाखळी गाडीवर बसलेल्या तरुणाने ओढली. यात एक सोनसाखळी रस्त्यावर पडली तर १८ ग्रॅमच्या ५० हजार किमतीच्या दोन सोनसाखळ्या लंपास करण्यात ते यशस्वी झाले. ही घटना रोहित सूर्यवंशी याने पाहिल्यांनतर त्याने त्या चोरट्यांचा मोटारसायकलने पाठलाग केला. मात्र, काही अंतरानंतर त्याची मोटारसायकल बंद पडल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.