आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांची शहरात पुन्हा एंट्री , टोळी सक्रिय झाल्याचा यंत्रणेचा अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पाचिदवसांच्या विश्रांतीनंतर चोरट्यांनी शहरात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. महाबळ परिसरातील श्रीनगरमधील शुभंकर अपार्टमेंटमधील विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक हितेंद्र गोमासे यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरफोडी झाली. तसेच मायादेवीनगरातील सैंदाणे यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना पुन्हा एकदा चॅलेंज केले आहे. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये चो-या करणाऱ्या चोरट्यांनी आता शहरातील मध्य वस्त्यांमध्ये एंट्री केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. यावर्षी रामनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 19 घरफोड्या आणि सात जबरी चो-या झाल्या आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एलईडीनेला काढून
श्रीनगरातील शुभंकर अपार्टमेंटच्या ‘सी’ विंगमध्ये राहणा-या विमान प्राधिकरणाच्‍या गोमासे हे सुट्या असल्याने सोमवारी त्यांच्या गावी नागपूर येथे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री अपार्टमेंटमध्ये घुसले. त्यांनी गोमासे यांच्या समाेरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या युवराज ढगे आणि मनीष शहा यांच्या फ्लॅटच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावल्या. 29 ऑक्‍टोंबरला झालेल्या चो-यांमध्ये याच पद्धतीची मोडऑपरेंडी चोट्यांनी वापरली होती. चोरट्यांनी गोमासे यांच्या घरातील कपाट फोडून कपडे अस्ताव्यस्त फेकले. फ्रीजमधील कोल्‍ड ड्रिंक, मिठाई, चिवडाही त्यांनी ताव मारला. गोमासे गावाला गेले असल्याने नेमके काय चोरीला गेले हे कळू शकले नाही. पण एलईडी टीव्ही चोरल्याचे लक्षात आले. सोसायटीचकेलेली नाही महाबळपरिसरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या श्रीनगर भागात शुभंकर अपार्टमेंट आहे. तीन विंग असलेल्या या अपार्टमेंटमध्ये एकूण २५ फ्लॅट अाहेत. मात्र, अजूनही त्यांची हाैसिंग साेसायटी केलेली नाही. शिवाय एवढ्या मोठ्या अपार्टमेंटसाठी एकही सुरक्षारक्षक ठेवलेला नाही. चार महिन्यांपूर्वी याच भागात चाेरी झाली त्या वेळी रहिवाशांनी सुरक्षा रक्षक ठेवण्याचे ठरले होते. मात्र एकमत झाले नाही.
मायादेवीनगरातून सिलिंडर,भांडी लंपास
महाबळपरिसरातील मायादेवीनगरातील सैंदाणे यांच्या घरी मंगळवारी रात्री घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरफोडी झाली. यात चोरट्यांनी घरातील दोन गॅस सिलिंडर, एक गॅस शेगडी आणि भांडी लंपास केल्याचे समोर आले आहेत. मात्र, सैंदाणे हे गावाला गेले असल्याने नेमके काय चोरी झाले, याची माहिती मिळू शकली नाही. तसेच या प्रकरणी रामनंदनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हाही दाखल नव्हता.