आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाराेळ्यात दूध डेअरीत चाेरी; 16 लाख लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चाेरटा झाला कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा- येथील अंबिका दूध डेअरीत शनिवारी पहाटे चोरट्याने कपाटाचे लाॅकर ताेडून १६ लाख १७ हजार रुपये लांबवले. चाेरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अाहे. याबाबत पाेलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल करण्यात अाला. 


अंबिका दूध डेअरीत शनिवारी पहाटे ४.२४ वाजता ३५ ते ४० वयाेगटातील चाेरटा शिरला. त्याच्या डाेक्यावर टाेपी ताेंडाला रुमाल बांधलेला हाेता. डेअरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना कुत्रा अंगावर धावला. त्यामुळे ताे परत जाऊन पुन्हा पाच मिनिटांनी अाला. त्याने टाॅमीने दरवाजाचा कडी-काेयंडा ताेडून कपाटातील १६ लाख १७ हजार रुपयांची राेकड लांबवली. 


डेअरी परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात अाले अाहेत. त्यात चाेरटा कैद झाला अाहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराडे, डीवायएसपी रफिक शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यासोबत एलसीबी, फिंगर प्रिंट, श्वान पथक आदी तपास पथके मागविण्यात आली होती. पाेनि एकनाथ पाडळे तपास करीत अाहेत. 


शेतकऱ्यांसाठी अाणले हाेते पैसे 
शुक्रवारीशेतकऱ्यांना दुधाचे पैसे देण्यासाठी रक्कम अाणली जाते. याबाबत एखाद्याला माहिती असावी. त्या टीप नुसार ही चाेरी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...