आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफाच्या दुकानातून साठ तोळे सोने लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/राहुरी - वांबोरीतील बाजारपेठेत रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सात जणांनी भोमा ज्वेलर्स या सराफी दुकानाचे कुलूप तोडून ६० तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दागिन्यांची किंमत सुमारे लाख रुपये आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लावून दरोडेखोरांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वांबोरीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे अलीकडच्या कालावधीत घडलेल्या घटनांवरून समोर आले आहे. मंदिरातील दानपेट्या फोडणे, घरफोड्या, दुकानांमधील किरकोळ चोऱ्या आदी घटनांत वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास तीन मोटारसायकलींवरून आलेल्या सात जणांनी वांबोरी येथील भोमा ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकला. दुकानालगतच भोमा यांचे घर आहे. दुकानातील काच फोडल्याचा आवाज आल्यानंतर संतोषी भोमा यांनी तातडीने वरच्या मजल्यावर झोपलेला त्यांचा मुलगा महेश भोमा यांना फोन केला. काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी महेश गॅलरीत आले असता दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावले. त्यामुळे त्यांनी दार बंद केले. तोपर्यंत दुकानाचे कुलूप कटरने तोडून दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला. अवघ्या चार मिनिटांत ते दागिने घेऊन पसार झाले.
सकाळी परिसरातील नागरिक जमा झाले. पोलिसही पंचनाम्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावातच नगरवेशीच्या बाहेर शासकीय विश्रामगृहाजवळ रस्त्याच्या कडेला दागिन्यांची रिकामी खोकी आढळली.

श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपनिरीक्षक महावीर जाधव, सहायक फौजदार एस. व्ही. पालवे, सरपंच उदयसिंह पाटील, माजी सरपंच कृष्णा पटारे, नितीन बाफना, पंचायत समिती सदस्य एकनाथ ढवळे यांनी भोमा कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली.

नगर येथून सहायक फौजदार एस. बी. गव्हाणे, पोलिस नाईक आर. आर. सूर्यवंशी हे श्वानपथक घेऊन घटनास्थळी पोहोचले. संतोष नावाच्या श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला. पण चोरटे मोटारसायकलींवर निघून गेल्याने फार दूरपर्यंत माग काढता आला नाही. या घटनेमुळे गावात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानाचे मालक सूरजकरण भोमा यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्ह्यांची संख्या वाढली
वांबोरीत गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी मळगंगा देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली. त्याचा अद्यापि तपास लागला नाही. आता सराफी दुकानावर दरोडा पडला. गावात भुरट्या चोऱ्या होत आहेत. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा.'' बापूसाहेबपटारे, सचिव, मळगंगा देवस्थान.

सीसीटीव्हीत कैद
भोमाज्वेलर्सच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर येताना जाताना कैद झाले आहेत. एकूण सात दरोडेखारे तीन मोटारसायकलींवर आल्याचे दिसते. या फुटेजमुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
दुकानातील शोकेसची काच फोडून सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. नगरवेशीबाहेर विश्रामगृहाशेजारी दागिन्यांचे रिकामे ट्रे आढळले. छाया: सचिन पटारे
पहार अन् लाकडी दांडे
सकाळीदुकानासमोरच दरोडेखोरांनी बरोबर आणलेली सात फुटी लोखंडी पहार, लाकडी प्लास्टिकचे दांडे, मोठा स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य आढळून आले. दुकानदारांनी विरोध केला असता, तर दरोडेखांनी त्यांना जबर मारहाण केली असती.
गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे
^दरोडेखारांकडूनसोनारांना टार्गेट केले जात आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्याने गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून सराफांना संरक्षण द्यावे. पंधरा दिवसांत आरोपींना ताब्यात घेतले नाही, तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ.'' संतोषवर्मा, जिल्हाध्यक्ष, सराफ सुवर्णकार संघटना.