आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलरच्या दुकानावर डल्ला; दिवाळीचे कपडे पळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पिंप्राळा-हुडकोपरिसरातील मुख्य चौकातील एका टेलरिंगच्या दुकानातच चोरट्यांनी शुक्रवारी रात्री डल्ला मारून सुमारे २२ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात शिलाई मशीनसह ग्राहकांनी दिवाळीसाठी टाकलेले नवीन कपडेच चोरट्यांनी लांबवल्याने त्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.
पिंप्राळा-हुडको परिसरातील मुख्य रस्त्यावर हमीद खान यांचे फैसल टेलर नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाच्या बाजूचा पत्रा कापून प्रवेश करीत दुकानात बराच वेळ थांबून पंखा, मोटार, शिलाई मशीनचे नट-बोल्ट उघडून चोरी केली. शनिवारी सकाळी वाजता कारागीर रमेश फिरोज यांनी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी खान यांना फोन करून माहिती दिली. खान यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता दोन शिलाई मशीन, मोटार, पंखा, ट्यूबलाइट आणि ग्राहकांचे ६० ते ७० कापडे गहाळ झाल्याचे दिसले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१०० फुटांवर पोलिस चौकी
खानयांच्या दुकानापासून केवळ १०० फूट अंतरावर पोलिस चौकी आहे. पण ही चौकी अनेक वेळा बंद असते. शुक्रवारीदेखील चौकी बंद होती. दरम्यान, खान यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या चहाचे दुकान पान सेंटरवरही गेल्या वर्षी चोरी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...