आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगरात भर दिवसा घरफोडी , ३३ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लांबविला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुक्ताईनगरातील रामदेव अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी भर दिवसा घरफाेडी झाली. त्यात चाेरट्यांनी १६ हजार ५०० रुपये राेख, ११ चांदीची नाणी, पाच ग्रॅमची सोनसाखळी, एक ग्रॅम सोन्याचा शिक्का, असा ३३ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला अाहे.
मुक्ताईनगर कॉलनीतील रामदेव अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २मध्ये व्यावसायिक जयंत पेठकर हे पत्नी नीलिमा मुलांसह राहतात. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता पेटकर बाहेरगावी गेलेले होते. त्यांची पत्नी शिक्षिका असून त्या मुले सकाळी ६.४५ वाजता शाळेत गेल्या हाेत्या. त्यामुळे घराला कुलूप हाेते. दुपारी १.३० वाजता नीलिमा पेठकर शाळेतून घरी अाल्या. त्या वेळी त्यांना दरवाजाला कडी लावलेली हाेती, तर कुलूप गायब असल्याचे आढळले. नीलिमा यांनी कडी उघडून घरात प्रवेश केला. त्या वेळेस त्यांना घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने पती जयंत यांना माहिती िदली. त्यानंतर काही क्षणातच पेठकर घरी अाले. त्यांनी कपाटातील वस्तू तपासल्या. त्यात त्यांना १६५०० रुपयांच्या नाेटांचे बंडल, हजार रुपये किमतीची ११ चांदीची नाणी, १३ ३०० रुपयांची पाच ग्रॅमची सोनसाखळी, एक ग्रॅम सोन्याचा शिक्का असा ३३ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज चाेरट्यांनी चोरून नेल्याचे दिसले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तपासावरूनही टाेलवाटाेलवी
घरफाेडीचा तपास करण्यावरूनही पोलिसांत तूतू-मैंमैं झाली. दाेघे एकमेकांवर टाेलवाटाेलवी करत हाेते. तुम्हाला तपास करायचा नसेल, तर मीच सर्व तपास करतो. तपास करायला मीच आहे काय? असे म्हणत त्यांच्यातच वाद झाला.