आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची ताडपत्री फाडून लाखांचा माल लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पुण्याहून जळगावात माल घेऊन आलेल्या अनिकेत ट्रान्सपोर्टच्या ट्रकची ताडपत्री फाडून चोरट्यांनी 7 लाख हजार ६६९ रुपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी वाजेदरम्यान एमआयडीसीतील लुंकड प्लास्टिकसमोरील अनिकेत ट्रान्सपोर्टच्या कार्यालयासमोर घडली. पाच महिन्यांत अशा पद्धतीने चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे.
पुणे येथील अनिकेत ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (क्रमांक एमएच- १२, जेएफ- १९९९) रविवारी सकाळी पुणे येथून माल घेऊन जळगावकडे निघाला हाेता. सायंकाळी वाजता ट्रक एमआयडीसीतील अनिकेत ट्रान्सपोर्टच्या गोदामाजवळ पोहोचला. रात्री १२.३० वाजेला ट्रकचालक रामेश्वर नारायण गाडेकर (रा. आडगाव, जि. औरंगाबाद) गाडी ट्रान्सपोर्टच्या कार्यालयासमोर लावून झोपण्यासाठी गेला होता. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ट्रकच्या मागे बांधलेली ताडपत्री फाडून ट्रकमधून ८९ बॉक्स म्हणजे लाख हजार ६६९ रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीची तक्रार आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ट्रान्सपोर्टच्या बाजूला असलेल्या ओम दालमिलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच रस्त्यावरील इतर कंपन्यांमधील फुटेजही तपासले. पण पोलिसांच्या हाती पाहिजे तशी समाधानकारक माहिती लागली नाही.

सीसीटीव्ही तपासले, या मालाची चोरी
ट्रकमधून वाहनासाठी लागणाऱ्या अॅमरॉन कंपनीच्या लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ६४ बॅटरी, टेक्स्मो कंपनीच्या ७६ हजार ६०० किमतीच्या १० मोटार, पिकांचे लाख ८७ हजार ३७६ रुपये किमतीचे औषधांचे बॉक्स आणि रंगाचे ६७ हजार ६९३ किमतीचे ११ डब्बे असे एकूण लाख हजार ६६९ रुपयांचे ८९ बॉक्स चोरी झाले आहेत.

१५ एप्रिल रोजी एमआयडीसीतील हॉटेल त्रिमूर्तीसमोर उभ्या असलेल्या कंटेनरच्या (सीजी- ०४, जेबी- ६६७९) मागील दरवाजाचे सील तोडून चोरट्यांनी ओनिडा कंपनीचे लाख २६ हजार १०० किमतीचे ९० एलईडी टीव्ही चोरले होते. हा कंटेनर भिवंडी येथून कोलकाता येथील खिदिलपुरा येथे माल घेऊन जात होता.

१९ जुलैला रात्री ट्रान्सपोर्टनगरातील हॉटेल साईनाथ समोरून चोरट्यांनी ट्रकची ताडपत्री फाडून ७६ हजार ६६५ रुपये किमतीचे वनस्पती तुपाचे ४११ डबे चोरले होते. इंदूरच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (एमपी- ०९, एचएफ- ४५८१) आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथून तुपाचे डबे घेऊन निघाला होता.