आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटे शिरले बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वसतिगृहात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लेवा एज्युकेशन साेसायटीच्या बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वसतिगृहात १० डिसेंबर ते १३ डिसेंबरदरम्यान विद्यार्थिनी गावाला गेलेल्या असताना चाेरी झाली. चाेरट्यांनी व्हेंटिलेटरमधून खाेलीत प्रवेश करत चार कपाटे फाेडून त्यातून ५,३०० रुपये लंपास केले अाहेत. दरम्यान वसतिगृहात सुरक्षारक्षक सीसीटीव्ही कॅमेरे असताना चाेरी झाल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला अाहे.
बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या अावारात असलेल्या ‘फकिरा हरी लेवा बाेर्डिंग हाऊस’ या मुलींच्या वसतिगृहात महाविद्यालयातील विद्यार्थिनी राहतात. डिसेंबरला महाविद्यालयाची सहल गेली हाेती. त्यानंतर १० डिसेंबरला सहलीहून परत अाल्यानंतर काही विद्यार्थिनी गावाला गेल्या. खाेली क्रमांक २०१ अाणि २०२मध्ये बी.एस्सी. काॅम्प्युटर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी राहतात. चाेरट्यांनी खाेली क्रमांक २०१ २०२च्या व्हेंटिलेटरमधून खाेलीत प्रवेश केला. चाेरट्यांनी दाेन्ही खाेल्यांमधील चार कपाटे फाेडली. तसेच त्यातील बॅग काढून चार विद्यार्थिनींचे हजार ३०० रुपये लंपास केले. यासह कपाटांतील साहित्य अाणि कागदपत्रेही अस्ताव्यस्त फेकून दिली. मात्र, याप्रकरणी रात्री उशीरापर्यत काेणत्याही पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता.
गंभीर प्रकार |सुरक्षारक्षक सीसीटीव्ही कॅमेरे असताना चाेरी; मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
जळगाव एमअायडीसीतील१८-‘व्ही’ सेक्टरमधील प्रेमप्रकाश पाॅलिमर्समधून साेमवारी पहाटे चाेरट्यांनी एलईडी टीव्ही, तर कंपनीच्या शेजारील लाेकेश टी सेंटरमधून ४०० रुपये राेख अाणि हजार रुपयांचे खाद्यपदार्थ चाेरून नेले हाेते. चाेरटे चाेरी करताना कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्यातील एक चाेरटा कंपनीतील जुना कामगार अाहे.

एमअायडीसीतील प्रेमप्रकाश पाॅलिमर्स कंपनीत साेमवारी पहाटे २.३२ वाजेच्या सुमारास गेटचे कुलूप ताेडून दाेन चाेरट्यांनी अात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काचेची केबिन फाेडून १८ हजार रुपये किमतीचा ह्युंदाई कंपनीचा एलईडी टीव्ही काढून नेला. चाेरटे कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले अाहेत. कंपनीत चाेरी केल्यानंतर चाेरट्यांनी जवळच असलेल्या लाेकेश टी सेंटरमधून ४०० राेख हजारांचे खाद्यपदार्थ लांबवले. चाेरी करणाऱ्या चाेरट्यांतील एक असलेला अनिल राठाेड (रा.रायपूर) हा दाेन वर्षांपूर्वी प्रेमप्रकाश पाॅलिमर्स कंपनीत कामाला हाेता. त्याच्यासह अाणखी एक चाेरटा सीसीटीव्हीत कैद झाला अाहे. याप्रकरणी वाॅचमन संजय साेनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमअायडीसी पाेलिसात चाेरीचा गुन्हा दाखल झाला अाहे.

सुरक्षा रक्षक असताना चाेरी कशी?
महिला वसतिगृहात दाेन सुरक्षारक्षक अाहेत. सायंकाळी ते सकाळी वाजेपर्यंत हे सुरक्षारक्षक असतात. तसेच वसतिगृहाला लाेखंडी जाळीचे संरक्षण अाहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही अाहेत. बाहेरून येणारी व्यक्ती एक तर सीसीटीव्हीत कैद हाेईल किंवा सुरक्षारक्षक तरी अडवतात. मात्र, नूतन मराठा महाविद्यालयाच्या बाजूने किंवा गच्चीवरूनही चाेरटे वसतिगृहात प्रवेश करू शकतात. त्यामुळे या ठिकाणावरून चाेरटे वसतीगृहात अाल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. तसेच या प्रकारामुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून महाविद्यालय प्रशासनाने यावर तात्काळ उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...