आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांपुढे पोलिसांनी टेकले हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरपोलिस ठाण्यापासून ५० मीटर अंतरावरील प्राप्ती इमिटेशन ज्वेलरी अँड गारमेंट या दुकानात मंगळवारी रात्री चोरी झाली. विशेष म्हणजे चोरटे दुकानात शिरले कसे? याचा शोध लागलेला नाही. दुकानातील ७८ हजार ५० रुपयांचा ऐवजलंपास केला अाहे. चार दिवसांपासून चोरटे शहरात धुमाकूळ घालत आहेत. तरीदेखील चोरटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांपुढे पोलिसांनी जणू हात टेकल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
हेमंत चौरसिया यांनी प्राप्ती इमिटेशन ज्वेलरी अँड गारमेंट हे दुकान मंगळवारी रात्री ८.३० वाजता बंद केले होते. मुख्य दरवाजाला त्यांनी दोन कुलूप लावले होते. तर आतील सर्व कुलुपांच्या चाव्या काउंटरमधील ड्रावरमध्ये ठेवल्या होत्या. बुधवारी सकाळी १० वाजता दोन कर्मचाऱ्यांनी दुकान उघडले. त्या वेळी त्यांना काउंटरवरील ड्रावर तोडून काही सामान अस्ताव्यस्त केलेला आढळून अाल्यानंतर चाेरी झाल्याचे लक्षात अाले. या प्रकरणी चौरसिया यांनी दिलेल्या फिर्यादीहून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतयेण्याचा मार्गच सापडेना

दुकानातचोरटे कोणत्या मार्गाने शिरले तो मार्गच पोलिसांना गवसला नाही. मुख्य रस्त्यावर चार मजली शोरूम आहे. चोरट्यांनी चवथ्या मजल्यावरील छताच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते त्यांच्याकडून तुटले नाही. तिसऱ्या मजल्याला लागून मोठी गॅलरी आहे. या गॅलरीच्या खिडकीचे गज वाकवलेले आहेत. मात्र त्यातूनही एखादी व्यक्ती आत येईल एवढी जागा उपलब्ध झालेली नाही. या गॅलरीत चाेरट्यांनी प्रातविधी केली आहे. दुसऱ्या मजल्याहून तिसऱ्या मजल्यावर येताना जिन्याच्या मध्यभागी एक लोखंडी दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यास दुकानाच्या मागच्या बाजूच्या पडदीवर जाता येते. या दरवाजाला आतून दोन कुलूप लावले होते. हे कुलूप तोडलेले आहे. कुलूप आतून असल्यामुळे बाहेरच्या बाजूने पडदीहून येऊन कुलूप तोडणे अशक्य आहे. या मार्गाचा बाहेर जाण्यासाठी उपयोग केला गेला असावा, असा अंदाज येतो. हा एकमेव दरवाजा तोडलेला आहे. त्यामुळे चोरटे दुकानात शिरले कसे? हा प्रश्न अद्याप उलगडलेला नाही.