आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाेरीच्या पैशांवर डान्सबारमध्ये एेश; चोरटे अटकेत, १४ तोळे सोने जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अक्सानगरातील प्राचार्यांच्या घरून लाख १२ हजारांचा एेवज लांबवणाऱ्या घराफाेड्यांना शुक्रवारी पहाटे एरंडाेलजवळून शहर पाेलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली अाहे. हे तिघे चाेरटे मास्टर काॅलनीतील रहिवासी असून त्यांनी चाेरी केल्याची कबुली दिली अाहे. त्यांच्याकडून पाेलिसांनी लाख २० हजार रुपये किमतीचे १४ ताेळे साेने हस्तगत केले अाहे. दरम्यान, तिघे चाेरटे चाेरीच्या पैशांवर मुंबई डान्सबारमध्ये जाऊन एेश करीत असल्याची माहिती पाेलिस तपासात समाेर अाली अाहे.
मेहरूण परिसरातील अक्सानगरात प्लाॅट क्रमांक ४९/१६ मध्ये ‘खुशबू’ बंगल्यात अँग्लाे हायस्कूलचे प्राचार्य शेख इक्बाल शेख उस्मान हे राहतात. ते अाॅक्टाेबरला सायंकाळी मुलीला भेटण्यासाठी अाणि अाराेग्याची तपासणी करण्यासाठी अाैरंगाबाद येथे गेले हाेते. अाॅक्टाेबरला सकाळी १० वाजता घरी परत अाल्यानंतर त्यांना चाेरी झाल्याचे लक्षात अाले हाेते. चाेरट्यांनी त्यांच्या घरातून लाख १२ हजार रुपये किमतीचे २५ ताेळे साेने अाणि लाख रुपये राेख चाेरून केले हाेते. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. त्यादृष्टीने पाेलिस तपास करीत हाेते.
दीडमहिन्यात १४ घरफाेड्यांमधून चार उघड
शहरातदीड महिन्यात १४ घरफाेड्यात झाल्या अाहेत. त्या पैकी केवळ चारच उघड झाल्या अाहेत. त्यातही तीन शहर पाेलिसांच्या पथकाने उघड केल्या अाहेत. तर एक तालुका पाेलिसांच्या पथकाने उघड केली अाहे. त्यात २५ सप्टेंबरला श्रद्धा काॅलनीतील घरफाेडी, १२ अाॅक्टाेबरला हाॅटेल पूनममधील अाणि अाॅक्टाेबर राेजी अक्सानगरात झालेली घरफाेडी शहर पाेलिसांच्या पथकाने उघड केली अाहे.

तर अाॅक्टाेबर राेजी तुरखेडा शिवारातील हाॅटेलमध्ये झालेली घरफाेडी तालुका पाेलिसांनी उघड केली हाेती. तर १२ सप्टेंबर राेजी वाघनगर परिसरातील जिजाऊनगरातील, १८ सप्टेंबर राेजी राधाकृष्णनगरात, अाॅक्टाेबर राेजी खान्देश काॅम्प्लेक्समध्ये दुकाने फाेडली हाेती, अाॅक्टाेबरला गायत्रीनगरातील अाणि १२ अाॅक्टाेबरला द्वारकानगरातील चाेरी अजूनही उघड झालेली नाही.

अाणखी गुन्हे
अटकेत असलेल्या दत्ता ऊर्फ माेहसीन याच्यावर एमअायडीसी पाेलिस ठाण्यात दुचाकी चाेरी, घरफाेडीचे गुन्हे दाखल अाहेत. उर्वरित दाेघांवरही वेगवेगळ्या पाेलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल अाहेत.

चाेरी केल्यानंतर रईस हा अाॅक्टाेबरला दुपारी वाजता त्याच्या अाेळखीचा असलेला बीजे मार्केटमधील एका साेन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराकडे गेला. त्या ठिकाणी त्याने अाई रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैसे लागणार असल्याने तिचे दागिने विकायचे असल्याचे कारागिराला सांगितले. या वेळी कारागिराने बिल मागितले असता जुने दागिने असल्याने बिले नसल्याचे रईसने खाेटे सांगितले. त्यामुळे कारागिराने १४ ताेळे साेन्याचे दागिने घेऊन त्याला लाख ८० हजार रुपये दिल्याचे रईसने जबाबात सांगितले. दरम्यान, रईसने ज्याला साेने विकले हाेते ताे २०१२मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात अटकेत हाेता.

मास्टर काॅलनीतील इरफान खान ऊर्फ इल्लू हैदर खान (वय २५), रईस खान ऊर्फ रईसलाला हनीफ मुलतानी (वय २२) अाणि दत्ता ऊर्फ माेहसीन शेख हमीद शेख (वय २१) हे तिघे भंगार बाजारात जुने माेबाइल विक्रीचा व्यवसाय करतात. १५ दिवसांपासून ते दरराेज दारू पिणे, माैजमजा करीत हाेते. एवढेच नव्हे तर मुंबई येथे डान्सबारमध्ये जात असल्याची माहिती शहर पाेलिस ठाण्याचे अक्रम शेख अाणि इम्रान सय्यद यांना मिळाली हाेती. तसेच एके दिवशी इरफानच्या खिशात १५ हजार रुपयांचे बंडल असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. भंगार बाजारात माेबाइल विक्री करणाऱ्याला एका रात्रीतून एवढे पैसे कुठून अाले? असा संशय पाेलिसांना अाला. यासंदर्भात शहर ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी वासुदेव साेनवणे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, संजय शेलार, दुष्यंत खैरनार, अमाेल विसपुते, संजय भालेराव, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, माेहसीन बिराजदार यांना तपासासाठी पाठवले. पाच दिवस तपास केल्यानंतर गुरुवारी अक्रम शेख, इम्रान सय्यद यांनी माेहसीन याला ताब्यात घेतले. त्याची चाैकशी केली असता त्याने चाेरी केल्याची कबुली दिली. त्याच्यासाेबत इरफान अाणि रईस असल्याचेही त्याने सांगितले. मात्र, ते सध्या मुंबईत असल्याचे त्याने गुरुवारी सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे पाेलिसांनी त्यांचे माेबाइल लाेकेश तपासले असता ते कल्याण येथे असून दाेघे खासगी ट्रॅव्हल्सने येत असल्याची माहिती पाेलिसांना मिळली. त्यावरून त्यांनी एरंडाेलजवळ सापळा रचून एका खासगी ट्रॅव्हल्समधून दाेघांना ताब्यात घेतले.

...अशी केली चाेरी
प्राचार्य इक्बाल शेख हे गावाला गेले असल्याची माहिती इल्लू याला मिळाली. त्यानंतर त्याने रईस अाणि माेहसीनला बाेलावून प्लान अाखला. त्यात माेहसीन हा रस्त्यावर लक्ष ठेवून हाेता, तर इरफान अाणि रईस दाेघे बाजूच्या घराच्या जिन्यावरून गॅलरीत चढले. त्यांनी कुलूप ताेडून चाेरी केल्याची कबुली पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत दिली अाहे.
बातम्या आणखी आहेत...