आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दागिना कॉर्नर’ चोरी प्रकरणातील दागिने; रोकड हस्तगत, पोलिसांची चमकदार कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दागिना कॉर्नरच्या चोरी प्रकरणातील आरोपी नईम तत्तड आणि बशीर कुरेशी यांना तपासासाठी उत्तर प्रदेशात नेण्यात आले होते. यात तत्तड याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरातून तीन किलो चांदी, 32 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 10 हजार रोख, ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यासह 24 कर्मचार्‍यांचे पथक या गुन्ह्यातील इतर आरोपींच्या शोधासाठी उत्तर प्रदेशात गेले होते. दरम्यान तेथे आरोपी मिळून आले नाहीत. मात्र, सर्व आरोपींनी चोरीचा ऐवजाची वाटणी करून घेतल्याचे तत्तडने सांगितले.