आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेबाइलवर बँकेचा पासवर्ड विचारून भामट्याने खात्यातून काढले हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भामट्याने एका युवकाच्या मोबाइलवर फोन करून बँकेचा पासवर्ड विचारून त्याच्या खात्यातील एक हजार रुपये काढून घेतल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता घडली. ज्या भामट्याने युवकाला फोन केला होता. त्याच्या माेबाइलचा डायलर टोनवर ‘आपण व्हीआयपी पर्सनला फोन केला आहे, यानंतर फोन करण्याच्या अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी’ अशी अाहे. 

रायपूर कंडारी येथे राहणाऱ्या भूषण परदेशी या युवकाच्या सोबत हा प्रकार घडला. भूषण बुधवारी सकाळी घरी असताना त्याला ९७०९८८०३२९ या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. अापले एसबीआयचे एटीएम कार्ड ब्लॉक केले असून पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य करा, असे समोरून भूषणला सांगण्यात आले. भूषणने बऱ्याच दिवसांपासून एटीएम कार्ड वापरलेले नसल्यामुळे त्याला ती माहिती खरी वाटली. 

त्याने त्या कॉलला प्रतिसाद देत आपल्या एटीएम कार्डचा १३ अंकी क्रमांक भामट्याला सांगितला. त्यानंतर त्याने चार अंकी पासवर्ड विचारला. परंतु भूषणने हा पासवर्ड सांगितला नाही. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. तासाभरात भूषणला एक एसएमएस आला. आपण कॉल सेंटरला दिलेली माहिती शेअर करू नका, असे त्या लिहिले होते. भूषणला संशय आल्याने बँकेत जाऊन चाैकशी केली. तसेच बँकेचे अकाउंट तपासले असता, खात्यातून हजार रुपये काढल्याचे समजले. पुन्हा एक हजार रुपयांची शॉपिंग केल्याचा एसएमएस आला. फसवणूक झाल्याचे भूषणच्या लक्षात आले. 
 
पैसे परत करण्यासाठी भरला दम 
भूषणनेदुपारी वाजता पुन्हा भामट्याच्या माेबाइलवर फोन केला. या वेळी भामट्याने फाेन उचलल्यानंतर भूषणने त्याला ‘माझे पैसे परत करा,’ असा दम दिला. त्यावर एका तासाने पैसे पुन्हा डिपॉझीट करतो, असे समोरून सांगण्यातही आले. परंतु रात्री उशिरापर्यंत पैसे परत मिळाले नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...