आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीपेठेत एक वर्षापासून बंद असलेले घर फोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील नवीपेठेतील एस 3 प्लाझाजवळ एक वर्षापासून बंद असलेल्या तीन मजली इमारतीत चोरट्यांनी 1 लाख 10 हजारांची वडिलोपार्जित तांबे, पितळाची भांडी चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. नवीपेठेतील सुरेश कलेक्शनजवळ देवेंद्र दिनकर गाजरे (वय 58) यांची तीन मजली इमारत आहे. गाजरे नोकरीच्या निमित्ताने 1996 ला औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत. त्यानंतर 2000 साली त्यांच्या आईसुद्धा औरंगाबाद येथे गेल्या. तिसर्‍या मजल्यावर 2012 पर्यंत पोस्टाच्या अधीक्षकांचे कार्यालय होते. जून 2013 पासून इमारत रिकामीच होती. देवेंद्र गाजरे यांचा मोठा मुलगा अमेय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केमिकल इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहे. तो सोमवारी क्रॉम्प्टनच्या कर्मचार्‍यांना घेऊन कनेक्शन तपासणीसाठी इमारतीत गेला असता, तेव्हा घरफोडी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरट्यांनी तीन पिढय़ांपूर्वीचे तांबे, पितळाची मोठी भांडी, गॅस शेगडी असा ऐवज लंपास केला.