आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेटारसायकलवरील नावावरून पाच चाेरटे जेरबंद,२४ तासांतच तपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गाेविंदा रिक्षा थांब्याजवळ मंगळवारी रात्री २.३० वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानकावरून घरी जाणाऱ्या युवकाला अडवून मारहाण करीत ३० हजार रुपये असलेली बॅग हिसकावणाऱ्या चोरट्यांना शहर पाेलिस ठाण्याच्या पथकाने २४ तासांच्या अात जेरबंद केले अाहे. विशेष म्हणजे चाेरट्यांच्या माेटारसायकलवर असलेल्या इंग्रजी नावावरून पाेलिसांनी त्यांचा शाेध लावला.

शाहूनगरातील शुभम गणेश टेकावडे (वय २०) हा उरण (नवी मुंबई) येथील जेएनपीटी, बाेकडवीरा येथे नावाशिवा बंदरावर नाेकरी करताे. ताे जून राेजी रात्री २.३० वाजता रेल्वेने जळगावी अाला. ताे पायीच घराकडे निघाला हाेता. त्या वेळी गाेविंदा रिक्षा थांब्याजवळ दाेन दुचाकींवर अालेल्या पाच तरुणांनी अडवून १०० रुपये मागितले. त्याने दिले नाहीत म्हणून मारहाण करून त्याची बॅग हिसकावून नेली. शुभम याने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री शहर पाेलिसात गुन्हा दाखल झाला होता.

अशीकेली कारवाई
शहरपाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी वासुदेव साेनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, संजय शेलार, दुष्यंत खैरनार, गणेश शिरसाळे, संजय भालेराव, अमाेल विसपुते, सुधीर साळवे, इम्रानअली सय्यद यांच्या पथकाने फिर्यादी शुभम याला विचारल्यावर त्याने पल्सरच्या मागच्या नंबर प्लेटवर ‘प्राची’ असे इंग्रजीत लिहिलेले असल्याचे सांगितले. या नावावरून पाेलिसांनी अातिष दिनेश बारसे (१९, रा. सिद्धी-विनायकनगर), केशव ऊर्फ जिगर गजानन जाेशी (२२, रा. इंद्रपस्थनगर) यांच्यासह सिद्धी-विनायकनगरातील अल्पवयीन दोन लक्ष्मीनगरातील एक असे संशयितांना ताब्यात घेतले अाहे.
बातम्या आणखी आहेत...