आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारात पाठलाग करून चोरट्याला केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटक केेेलेल्या चोरट्यासोबत गस्तीवरील आरपीएफ पथकातील जवान.
भुसावळ - अपमार्गावरील पवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवाशांना धमकावून लुटल्याची घटना, रविवारी रात्री ११ वाजता ओढा (ता. नाशिक) स्थानकाजवळ घडली. प्रवाशांकडून २१०० रुपयांची रोकड आणि पाच हजारांचा मोबाइल हिसकावल्यानंतर, धोक्याची साखळी ओढून तिघा चोरट्यांनी पळ काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र, गस्तीवरील आरपीएफच्या पथकाने अंधारातही चोरट्यांचा पाठलाग करत तिघांपैकी एकाला पकडले. पकडलेला चोरटा नवेगाव (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहिती अशी की, मनमाड स्थानकावरून पवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात तीन चोरटे चढले. गाडीने मनमाड स्थानक सोडताच तिन्ही चोरट्यांनी गाडीतील प्रवाशांना दमबाजी करून पैसे हिसकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी २१०० रुपये राेख हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ७१०० रुपयांचा ऐवज लुटला. ओढा स्थानक जवळ असतानाच गाडीची धोक्याची साखळी चोरट्यांनी ओढली. यामुळे रात्री ११ वाजता गाडी जंगलातच थांबली. याच गाडीत भुसावळ रेल्वे यार्डातील आरपीएफ जवानांचे पथक गस्त घालत होते. गस्तीवर असलेले आरपीएफचे सहायक फौजदार पी.एल. तडवी, व्ही.एम. फालक, एन.जी. सोनवणे, डी.एस यादव, अंतरसिंग, संतोष कुमार एम.बी. चौधरी यांनी बाहेर येत चौकशी केली. तर अंधारात तीन चोरटे पळत असल्याने आरपीएफच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. आरपीएफने पाठलाग करून तीन चोरट्यांपैकी इम्रान खलील खान (वय २२, रा. नवेगाव, ता. चाळीसगाव) याला पकडले. या वेळी अन्य दोन संशयित जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले.

पथकाला ३००० रुपयांचे बक्षीस
अंधारातपाठलाग करून चोरट्याला अटक केल्याने आरपीएफच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली. लोहमार्ग पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी या कामगिरीची दखल घेतली. त्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना १५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच आरपीएफ आयुक्त चंद्र मोहन मिश्र यांनीही पथकाला १५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जीआरपी पोलिसांकडून आरपीएफ जवानांच्या गस्ती पथकाला बक्षीस मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बातम्या आणखी आहेत...