आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरी चोरी करणारे दोन भामटे अवघ्या दोन तासांत जेरबंद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेस्थानक परिसर, बळीराम पेठ आणि जुने बसस्थानक परिसरात मंगळवारी रात्री १० ते १२ वाजेदरम्यान तीन जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. यात चोरट्यांनी हजार ३०० रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याविषयी रात्री १२ वाजता शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री वाजता दोघा चोरट्यांना गेंदालाल मिल परिसरातून ताब्यातून घेण्यात यश आले. दरम्यान मंगळवारी सकाळी ते ६.३० वाजेदरम्यान चोरट्यांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या होत्या.

रेल्वेस्थानक परिसरातील हाॅटेल केवलच्या बाजूच्या गल्लीतून मंगळवारी रात्री १० वाजता शिव शंकर चैतन्यदास हे जात होते. या वेळी त्यांच्या बाजूने दोन तरुण बजाज डिस्कव्हर गाडीवर आले. त्यांनी चैतन्यदास यांना मारहाण करत त्यांच्याजवळील ६५०० किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल
जळगाव शिवतीर्थमैदानासमोरील बसस्थानकाजवळ बुधवारी रात्री ९.५० वाजता चोरट्यांनी एका महिलेची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबवली. अर्ध्यातासानंतर १०.१५ वाजता बळीरामपेठेतील सारस्वत बँकेसमोरही त्याच चोरट्यांनी पुन्हा सोनसाखळी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला.

शनिपेठेतील दाळफडमधील नेहा गणेश जोशी (वय २९) या तळवलकर्स जिममध्ये प्रशिक्षक आहेत. त्या काम आटोपून घरी परत जात असताना शिवतीर्थ मैदानासमोरील बसस्थानकाजवळ होंडा युनिकाॅर्न गाडीवर आलेल्या दोघांनी त्यांना धक्का देत ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबवून बसस्थानकाकडे पसार झाले. दुसऱ्या घटनेत बळीरामपेठेतील शोभा संजय महाजन (वय ५३) या रात्री १०.१५ वाजता बाहेर फिरण्यासाठी निघाल्या होत्या. त्या वेळी गांधी मार्केटजवळील सारस्वत बँकेसमोर त्या दोघा तरुणांनी महाजन यांना धक्का देऊन सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. त्यानंतर चोरटे टाॅवर चाैकाकडे सुसाट वेगाने निघून गेले.

दाेन्ही घटनांमधील चोरटे सारखेच
शहरातबुधवारी शिवतीर्थ मैदानाजवळील लांबवलेली सोनसाखळी आणि बळीरामपेठेतील चोरीचा प्रयत्न करणारे दोघे चोरटे एकच असल्याचे पीडितांनी केलेल्या वर्णनावरून समोर आले आहे. दोन्ही चोरटे २० ते २५ वयोगटातील असून मागच्याचे केस लांब होते. एकाने काळा तर एकाने लाल रंगाचा शर्ट घातला होता.

गेंदालाल मिल परिसरात रात्रीच कोंबिंग आॅपरेशन
सुरक्षारक्षकपरदेशी यांनी रात्री १२ वाजता शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात त्यांनी दोन्ही चोरट्यांमधील एकाने निळ्या रंगाचा तर दुसऱ्याने लाल रंगाचा चाैकडीचा शर्ट परिधान केला होता. दोघे २० ते २५ वयोगटातील तरुण होते. त्यांच्याजवळ बजाज डिस्कव्हर ही गाडी होती, असे वर्णन सांगितले. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा अंदाज आला. त्यामुळे रात्रीच पोलिस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी वासुदेव सोनवणे, राजेंद्र कोलते, विजयसिंग पाटील, दुष्यंत खैरनार, संजय शेलार, अक्रम शेख, इम्रान सय्यद, प्रितम पाटील, संजय भालेराव, गणेश शिरसाळे याची टीम तयार केली. या टीमने रात्री गेंदालाल मिल परिसरात कोंबिंग आॅपरेशन केले.