आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खिशातून अलगद मोबाइल काढणाऱ्या चोराची धुलाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी इम्रान शेख - Divya Marathi
आरोपी इम्रान शेख
जळगाव - रिक्षेची मोटारसायकलीला धक्का लागल्यावरून दोन जणांचा शुक्रवारी आर.आर. विद्यालयासमोरील गुरुद्वाराजवळ वाद सुरू होता. याचदरम्यान चोरट्याने मोटारसायकल चालकाच्या शर्टच्या वरच्या खिशातून मोबाइल लांबवला. हे पाहून मोटारसायकलचालक नागरिक चोरट्यामागे पळत सुटले त्याला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली.शहरात दिवसा चोरी करण्याच्या घटनांमुळे हैराण झालेल्या जळगावकरांसाठी आता रस्त्यावर होणाऱ्या लुटमारीच्या घटना डोकेदुखी ठरू पाहत आहे, असे असतानाही पोलिस प्रशासन या चोरट्यांचा बंदोबस्त करीत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत.
बुधवारी रात्री कंजरवाड्यात एका वृद्धाला लुटण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी वाजता आर.आर. विद्यालयासमोरील गुरुद्वाराजवळ रिक्षेचा मोटारसायकलीला धक्का लागला म्हणून मोटारसायकलचालक रवींद्र देविदास पवार रिक्षाचालक यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच वेळी इम्रान शेख (वय २८, रा. गेंदालाल मिल) याने पवार यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून मोबाइल लांबवला. हे पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यासह नागरिक चोरट्यांच्या मागे धावत सुटले. पळत असताना चोरटा इम्रान हा थेट ऑर्किड हॉस्पिटलमध्ये घुसला. त्या वेळी त्याला हॉस्पिटलचे सुरक्षारक्षक विजय तायडे यांनी पकडले. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांना बोलवून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. इम्रान याने पोलिसांजवळ मोबाइल चोरल्याची कबूल दिली आहे.

जळगाव शिरसोलीकडूनजळगावकडे येत असताना शुक्रवारी सकाळी वाजता बसचा (एमएच- २०, डी- ८७५४) डी मार्ट समोरील रस्त्यावर मिनीडोअर (एमएच- १९, जे- ७१०५) हिस कट लागला. यात मिनीडोअरचे किरकोळ नुकसान झाले. मिनी डोअरचालक शरीफ शे. शफी (वय ३२, शिरसोली) याने बसचालक वाल्मीक जाधव (वय ३०, पाचोरा) यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या वेळी दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. बसचालक जाधव यांच्या फिर्यादीवरून मिनीडोअर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...