आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देश काॅम्प्लेक्समध्ये दाेन चोऱ्या; तीन ठिकाणी प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात बऱ्याच व्यापारी संकुलामध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, जिन्यांना लाेखंडी गेट नाही. ही संधी साधत चाेरट्यांनी घरफाेडीनंतर अापला माेर्चा व्यापारी संकुलाकडे वळवला अाहे. चाेरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री खान्देश काॅम्प्लेक्समधील एक रुग्णालय अाणि वकिलाचे कार्यालय फाेडले. यात त्यांनी रुग्णालयातून बीपी तपासण्याचे दाेन यंत्र तर वकिलाच्या कार्यालयातून दाेन लॅपटाॅप लंपास केले. तर अश्याेरन्स कंपनी, सीएचे कार्यालय एका दुकानाचे कुलूप तुटल्याने चाेरट्यांचा चाेरीचा प्रयत्न फसला. शहरात गेल्या १५ दिवसांपासून चाेऱ्यांचे सत्र सुरू अाहे. तीन दिवसांत अाठ ठिकाणी चाेऱ्या झाल्या असून पाेलिस प्रशासन चाेरट्यांना जेरबंद करण्यास अपयशी ठरत अाहे.

लॅचमुळे वाचले सीएंचे कार्यालय
खान्देश काॅम्प्लेक्समधील ब्लाॅक क्रमांक ५२ मध्ये चार्टर्ड अकाउंंटंट डी.एल. सिसाेदीया यांचे कार्यालयाचे कुलूप ताेडले. मात्र, लाकडी दरवाजाला लॅच लाॅक हाेते. त्यामुळे चाेरट्यांचा चाेरीचा प्रयत्न फसला. तसेच चाेरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या नितीन छाजेड यांच्या यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप ताेडून चाेरीचा प्रयत्न केला. मात्र, एकच कुलूप तुटले तर दुसरे तुटलेच नाही. त्यामुळे चाेर रिकाम्या हाती परतले.

पॅण्टच्या खिशातून १८ हजार रुपये लांबवला
गेंदालालमिल परिसरातील बिल्डिंग क्रमांक २१मधील खाेली क्रमांक १६मध्ये लतीफ मुसा निजामुद्दीन हे राहतात. मंगळवारी रात्री चाेरट्याने त्यांच्या घरात घुसून पॅण्टमधील १७ हजार ४०० रुपये अाणि दाेन माेबाइल लंपास केले अाहेत. याप्रकरणी त्यांनी शहर पाेलिस ठाण्यात माहिती दिली अाहे.

खान्देश काॅम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे कार्यालय अाहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर लाेखंडी चॅनेल गेट अाहे. चाेरट्यांनी रुग्णालयात चाेरी केल्यानंतर न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या कार्यालयात चाेरीचा प्रयत्न केला. चाेरट्यांनी अगाेदर कुलूप ताेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाेखंडी गेटाला तीन अाणि लाकडी दरवाजाला दाेन असे एकूण कुलूप लावलेले हाेते. त्यामुळे चाेरट्यांनी लाेखंडी गेटच भिंतीतून उखाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाेरटे त्यात अपयशी ठरले. २०१२ मध्ये चाेरट्यांनी न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे कार्यालय फाेडून तिजाेरी चाेरली हाेती. मात्र तिजाेरीचे वजन जास्त असल्याने त्यांनी तिजाेरी गच्चीवर घेऊन जाऊन फाेडण्याचा प्रयत्न केला हाेता. पण मजबूत असलेली तिजाेरी चाेरट्यांकडून फुटली नसल्याने ती तिजाेरी गच्चीवर टाकून चाेरटे पसार झाले हाेते. त्या वेळी तिजाेरीत ७५ हजार रुपये असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वकिलाच्या कार्यालयातून दाेन लॅपटाॅप लंपास
खान्देश काॅम्प्लेक्समधील ब्लाॅक क्रमांक ५३(अ)मध्ये अॅड.अशाेक. अार. माथुरवैश्य यांचे कार्यालय अाहे. मंगळवारी रात्री ९.३० वाजता अॅड. माथुरवैश्य यांनी कार्यालय बंद केले. बुधवारी सकाळी वाजता त्यांना कार्यालयाचे कुलूप ताेडल्याचा एका दुकानदारांचा फाेन अाला. त्यांनी कार्यालयात जाऊन पाहिल्यानंतर त्यांना दरवाजाचा काेयंडा ताेडून कार्यालयातील ६५ हजार रुपये किमतीचे दाेन लॅपटाॅप चाेरी झाल्याचे दिसले. तर कपाटातील अाणि ड्राॅव्हरमधील सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकलेली हाेती. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

रुग्णालयातून बीपी माेजण्याचे यंत्र चाेरी
खान्देशकाॅम्प्लेक्समधील ब्लाॅक क्रमांक ५० मध्ये डाॅ. उल्हास कडुस्कर यांचे रुग्णालय अाहे. मंगळवारी रात्री वाजता परिचारीकेने नेहमीप्रमाणे रुग्णालय बं केले हाेते. त्यानंतर बुधवारी सकाळी डाॅ. कडुस्कर यांना शेजाऱ्यांनी फाेन करून रुग्णालयात चाेरी झाल्याची माहिती दिली. चाेरट्यांनी रुग्णालयातून रक्तदाब माेजण्याचे यंत्र, वजन माेजण्याचा इलेक्ट्राॅनिक काटा, चांदीसारख्या दिसणाऱ्या कृष्ण मूर्ती, घाेड्यांच्या दाेन मूर्ती, पेपर वेटही चाेरट्यांनी लंपास केले. तर कागदात गुंडाळून ठेवलेले साेनाेग्राफी मशीनही चाेरट्यांनी कागद फाडून बघितले. मात्र, ते घेऊन गेले नाही.
बातम्या आणखी आहेत...